लंडन: भारताविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी फक्त आठ दिवसांचा कालावध शिल्लक आहे आणि न्यूझीलंडचा संघ मोठ्या अडचणीत सापडलाय. WTC फायनल आधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात होत आहे. ही कसोटी सुरू होण्याआधी न्यूझीलंडला तीन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार केन विलियमसन आणि फिरकीपटू मिशेल सॅटनर हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर सामना सुरू होण्याच्या काही तास आधी विकेटकीपर फलंदाज बीजे वॉटलिंग देखील संघातून बाहेर झालाय. वाचा- बर्मिंघम कसोटीच्या काही तास आथी वॉटलिंगची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे तो सामन्यात खेळणार नाही. त्याच्या ऐवजी टॉम ब्लंडेलचा संघात समावेश करण्यात आलाय. WTCचा फायनलच्या आधी न्यूझीलंड संघाच्या अडचणी काही कमी होण्याची शक्यता दिसत नाही. वाचा- भारताविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेकडे तयारीसाठीची संधी म्हणून पाहिले जात होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा न्यूझीलंडला फायदा होईल असे म्हटले जाते होते. पण या मालिकेत एका पाठोपाठ एक असे महत्त्वाचे तीन खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. वाचा- संघातील अनुभवी विकेटकीपर वॉटलिंगला पाठ दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतून तो बाहेर झालाय. भारताविरुद्ध होणारी WTC फायनल ही त्याची अखेरची कसोटी असेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा त्याने केली आहे. आता त्याची दुखापत गंभीर असेल तर फायनल सामना न खेळता निवृत्ती घ्यावी लागू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TkP3yc
No comments:
Post a Comment