साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पाचव्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना काही प्रेक्षकांनी खेळाडूंना अपशब्द वापरले. वाचा- टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पाचव्या दिवशी झालेल्या या घटनेबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक पत्रक जारी केले आहे. आम्हाला रिपोर्ट मिळाला आहे की न्यूझीलंडच्या खेळाडूंना काही अपशब्द वापरण्यात आले. आसीसीच्या सुरक्षा टीमने संबंधित आरोपींची ओळख निश्चित करून त्यांना मैदानाबाहेर केले. वाचा- शकते आम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचे अपमानजनक वर्तन स्वीकार करणार नाही, असे देखील आयसीसीने म्हटले. एका क्रिकेट वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार ब्लॉक एम मध्ये बसलेल्या दोन प्रेक्षकांनी अपशब्द वापरले. हा ब्लॉक संघाच्या हॉटेलच्या खाली आहे. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरला उद्देशून अपशब्द वापरण्यात आले. अर्थात न्यूझीलंडचा जलद गोलंदाज टीम साउदीने सांगितले की संघातील कोणत्याही खेळाडूला याची कल्पना नाही. आम्ही क्रिकेट खेळत आहोत मैदानाबाहेर काय होते त्याची आम्हाला माहिती नाही, असे तो म्हणाला. वाचा- याआधी जानेवारी महिन्यात सिडनी क्रिकेट मैदानात भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद सिराज याच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. साउदम्प्टन येथे झालेल्या घटनेनंतर मैदानावर उपस्थित सुरक्षा कर्मचारी लगेच सक्रीय झाले. काही क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर या घटनेचा उल्लेख केला. त्यानंतर आयसीसीने कारवाई केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TYOESp
No comments:
Post a Comment