साऊदम्पटन : भारतीय चाहत्यांचे लक्ष आता दुसऱ्या डावावर लागलेले असेल. पण रोहित शर्माने जर एक चुक सुधारली तर भारतीय संघ दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकतो. कारण एका चुकीमुळे रोहितला पहिल्या डावात मोठी खेळी साकारता आली नव्हती. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या, यामध्ये भारताच्या सलामीवीरांचा महत्वाचा वाटा होता. रोहितने यावेळी भारतीय संघाला दमदार सलामी करून दिली होती. रोहितने सलामीला येऊन ३४ धावांची भर घातली आणि भारताच्या धावसंख्येचा पाया रचला होता. पण यावेळी एक चुक रोहित शर्माला चांगलीच भोवली होती. पहिल्या डावात चांगली सुरुवात झाल्यावर रोहित शर्माकडून एक मोठी चुक झाली होती. रोहित त्यावेळी बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी रोहितची बॅट ही त्याच्या शरीरापासून फारच लांब होती आणि त्यामुळे त्याचा चांगला फटका मारता आला नव्हता. त्यामुळेच रोहित बाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण रोहितने या डावात जर ही एक चुक सुधारली तर नक्कीच तो माठी धावसंख्या उभारू शकतो. त्यामुळे रोहित आता दुसऱ्या डावात ही चुक सुधारतो का आणि किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भरताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाचा पहिला डाव २४९ धावसंख्येवर संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडने पिहल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ ही आघाडी संपवून किती धावा करतो, हे सर्वात जास्त उत्सुकतेचे असेल. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने अर्धशतक झळकावले, पण पहिल्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला ही किमया साधता आली नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने यावेळी ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्यामुळेच न्यूझीलंडला भारतावर ३२ धावांची आघाडी मिळवता आली. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांमध्ये भारताकडून चुका घडल्या आणि त्याचाच फटका आता त्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xHoZwb
No comments:
Post a Comment