साउदम्प्टन: भारतीय संघातील काही खेळाडू असे आहेत जे मैदानावर दंगा मस्ती करत असता. अशात कर्णधार विराट कोहलीचा देखील समावेश होतो. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये देखील असेच काही पाहायला मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वाचा- पाचव्या दिवशी देखील विराट कोहलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहित शर्माची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. वाचा- आणि स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते. चेंडू टाकल्यानंतरच्या वेळेत विराटने रोहित आणि अन्य खेळाडूंना जांभई देत काही तरी बोलला. त्यानंतर थंडीमुळे दोन्ही हात एकमेकांना घासू लागला. यावर रोहित शर्मा त्याला हाताने इशारा करत करत काही तरी बोलला. रोहित विराटला काय म्हणाला हे समजू शकले नाही. पण त्याच्या इशाऱ्यावरून असे वाटते की, अरे अरे फायनल मॅच खेळतोय आणि तुझे काय चाललय. जांभई का देतोस मॅच वर लक्ष दे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- पाचव्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या सत्रात भारताच्या २१७ धावांच्या पुढे मजल मारली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gNfQeE
No comments:
Post a Comment