साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बुहप्रतिक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी फक्त २४ तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. उद्या १८ जूनपासून साउदम्प्टन येथील द रोझ बाऊल या मैदानावर ही लढत सुरू होईल. वाचा- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच चॅम्पियन ठरवला जाणार आहे. या ऐतिहासिक लढतीबाबत संपूर्ण क्रिकेट विश्वाची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही संघांनी १५ जणांच्या नावाची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे. आता अंतिम ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- या सामन्यासाठी दोन्ही संघात कोणते खेळाडू असतील याबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांची मते सोशल मीडियावर सांगितली आहेत. सर्व सामान्य चाहते देखील सोशल मीडियावरून अंतिम ११ खेळाडूंची निवड करत आहेत. तुम्ही देखील तुमचा ११ जणांचा संघ निवडून आम्हाला कळवा.. वाचा- भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), उमेश यादव, हनुमा विहारी. न्यूझीलंड संघ : विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, बोल्ट, कोन्वे, कॉलन डी ग्रँडहोम, मॅट हॅन्री, काइल जॅमिसन, टॉम लॅथम, हॅन्री निकोल्स, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, वॉटलिंग, विल यंग.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SFrHUb
No comments:
Post a Comment