साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. येथे गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात झाली होती तो शुक्रवारी दुपारपर्यंत सुरू होता. मैदानात चारही बाजूला पाणीच पाणी होते. मैदानातून पाणी काढण्याची चांगली व्यवस्था असून देखील पहिल्या दिवसाचा खेळ झाला नाही. वाचा- पहिल्या दिवशी सामना न झाल्याने भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अन्य गोष्टींचा आनंद घेतला. भारतीय खेळाडू टेबल टेनिस आणि डार्ट खेळत होते. तर न्यूझीलंडचे खेळाडू कॉफी घेत चर्चा करताना दिसले. वाचा- सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग झाली. आता दुसऱ्या दिवशी दिसाला मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या हवामान विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या अपडेटनुसार १९ जून रोजी हवामान थोडे मोकळे राहण्याची शक्यता आहे. पण पुन्हा रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. आज सलग पाऊस पडणार नाही. मात्र रविवार आणि सोमवार या दोन दिवशी पावसाची शक्यता आहे. वाचा- आता ही लढत गरज पडली तर राखीव दिवशी देखील खेळवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार गरज पडली तर सहाव्या दिवशी देखील सामना होऊ शकतो. आयसीसीने या सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवला आहे. सामना सुरू होण्याआधीच पाऊस आणि जोरदार वाऱ्याची अंदाज वर्तवण्यात आला होता. इंग्लंडच्या हवामान विभागानुसार शनिवारी सकाळी १० वाजता, १२ वाजाता आणि दुपारी २ वाजता १० टक्के पावसाची शक्यता आहे. तर संध्याकाळी पाच वाजता ३० टक्के पाऊस पडू शकतो. शनिवारी म्हणजे आज भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता (इंग्लंडमध्ये सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी) सामना सुरू होईल. पहिल्या दिवशी टॉस देखील झाला नाही. त्यामुळे भारतीय संघाला अजून संघात बदल करण्याची संधी आहे. आयसीसीच्या नियमानुसार टॉस होईपर्यंत अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करू शकते. पहिल्या दिवशी टॉस न झाल्याने दोन्ही संघांना खेळपट्टी आणि हवामानाची दशा लक्षात घेऊन बदल करण्याची संधी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qaL4kv
No comments:
Post a Comment