साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या एक दिवस आधी भारताने अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला. काल शुक्रवारी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला. नाणेफेक देखील न झाल्याने आयसीसीच्या नियमानुसार टीम इंडियाला संघ बदलण्याची संधी आहे. वाचा- साउदम्प्टने येथील सध्याचे हवामान पाहाता फिरकी गोलंदाजापेक्षा जलद गोलंदाज अधिक उपयुक्त ठरू शकतील. भारताने अंतिम ११ मध्ये २ फिरकी आणि ३ जलद गोलंदाजांना स्थान दिले आहे. यात बदल करून भारताने ४ जलद आणि एका फिरकीपटूला संधी द्यावी असे बोलले जात आहे. वाचा- कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन संघात बदल करणार का या प्रश्नाचे उत्तर टीमचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर श्रीधर यांनी दिले. भारतीय संघाने निवडलेल्या अंतिम ११ मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ते कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करण्यास सक्षम आहेत. वाचा- इंग्लंडमध्ये हवामान अचानक बदलते. याचा अर्थ तापमान कमी होते आणि ढगाळ वातावण असते. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ झाला नाही. आता पुढील काही दिवस पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी अंतिम संघात बदल करण्याची संधी आहे तर तशी करावी असे मत व्यक्त केले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीधर म्हणाले, मला अपेक्षा होती की हाच पहिला प्रश्न विचारला जाईल. ज्या खेळाडूंची निवड झाली आहे ते सक्षम आहेत. माझ्या मते हा असा संघ आहे जो कोणत्याही खेळपट्टीवर आणि हवामानात खेळून चांगली कामगिरी करू शकतो. जर गरज पडली तर तसा निर्णय घेतला जाईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gN0sin
No comments:
Post a Comment