नवी दिल्ली : भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असला तरी त्यांच्यावर काही बंधन घालण्यात आली होती. पण आज पहिल्यांदाच भारतीय संघाने इंग्लंडमध्ये शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असला तरी त्यांना तीन दिवस कडक क्वारंटाइनमध्ये राहावे लागले होते. यावेळी खेळाडूंनी एकमेकांना भेटायची परवानगीही नव्हती. पण आज पहिल्यांदाच भारताचे सर्व खेळाडू एकत्रितपणे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आणि यावेळी सर्व खेळाडूंनी मिळून कसून सराव केला. प्रत्येक खेळाडूने यावेळी आपली शक्ती पणाला लावली आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत, हे दाखवून दिले. भारतीय खेळाडूंच्या सरावाचा व्हिडीओ यावेळी बीसीसीआयने शेअर केला आहे. बीसीसीआयने यावेळी म्हटले आहे की, " भारतीय संघाने आज पहिल्यांदा इंग्लंडमध्ये सराव केला. हा सराव करत असताना सर्व खेळाडू उत्साहीत होते. विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीची भारतीय संघाची तयारी जोरदार सुरु आहे." भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी १८ ते २२ जून या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या फायनसलाठी भारताचा संघ इंग्लंडमध्ये काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता. पण त्यांना आतापर्यंत सराव करता आला नव्हता. पण आज पहिल्यांदाच भारताचा संघ मैदानात एकत्रितपणे सराव करण्यासाठी उतरला. त्यामुळे आता या फायनलसाठी भारतीय संघ सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ हा इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. न्यूझीलंडच्या संघासाठी ही फायनलपूर्वी चांगली तयारी असेल. त्याचबरोबर इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टी यांच्याशी त्यांना आता जुळवून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही. पण दुसरीकडे मात्र भारतीय संघ बऱ्याच कालावधीनंतर हा सामना खेळणार आहे. भारतामध्ये आयपीएल खेळवण्यात आली होती. पण करोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागली. त्यानंतर भारताचे खेळाडू पहिल्यांदाच मैदानात सरावासाठी एकत्रितपणे आज उतरले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pHAKjm
No comments:
Post a Comment