नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या घरी आता एक आनंदाची बातमी आली आहे. चहलने या गोष्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. चहल हा गेले काही दिवस टेंशनमध्ये होता. कारण चहलच्या घरामध्ये टेंनशनचे वातावरण होते, पण हे टेंशन आता खल्लास झाले आहे. कारण चहलच्या घरी आता गुड न्यूज आली असून त्याने या गोष्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअरही केला आहे. चहलच्या या सोशल मीडियावरील फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे. चहलचे आई-वडिल या दोघांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे चहलच्या घरात टेंशनचे वातावरण होते. पण आता चहलचे आई आणि बाबा आता करोनामुक्त झाले आहेत. चहलने आपल्या आई-वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोमध्ये चहलची पत्नी धनश्री वर्माही दिसत आहे. चहलची पत्नी धनश्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये धनश्रीने म्हटले होते की, " युजवेंद्रच्या वडिलांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये करोनाची गंभीर लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याचबरोबर युजवेंद्रच्या आईलाही करोनाची लागण झाली आहे. पण तिचे उपचार आम्ही घरीच करत आहोत. मी माझ्या कुटुंबियांकडे लक्ष देत आहे, तुम्हीदेखील तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या." धनश्रीच्या या पोस्टनंतर आता युजवेंद्रने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आपले आई आणि बाबा आता करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TlsSbd
No comments:
Post a Comment