नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज एक गोष्ट करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करायला सज्ज होत आहे. पण त्याचवेळी कोहलीने सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे. भारतीय संघ फायनलची जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी भारतीय संघ सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्यात कोहलीची एक गोष्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. इंग्लंडमध्ये गोलंदाजीला पोषक वातावरण असते. त्यामुळे कोहलीने सराव सामन्यात चक्क गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कोहली गोलंदाजी करत फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाला धक्का देणार का, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे. कोहलीची फलंदाजी ही क्रिकेट विश्वाला माहिती आहे. पण कोहलीची गोलंदाजी आतापर्यंत जास्त लोकांनी पाहिलेली नाही. कोहली हा मध्यमगती वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे कोहलीने जर फायनलमध्ये गोलंदाजी केली तर भारतीय संघाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. कोहलीने आता गोलंदाजीचा सरावही केला आहे. पण कोहली फायनलमध्ये गोलंदाजी करणार का, हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. भारतीय संघ गेल्या कित्येक दिवसांपासून कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांना लयीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे भारतासाठी फायनलमध्ये न्यूझीलंडशी दोन हात करणे नक्कीच सोपे नसेल. कारण न्यूझीलंडचा इंग्लंडमध्ये येऊन बराच कालावधी झाला आहे आणि त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्याचबरोबर त्यांना फायनलपूर्वी दोन कसोटी सामने खेळायलाही मिळाले आहे. त्यामुळे न्यूझीलंडने फायनलची जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे भारतीय संघही कमी नाही. कारण सराव सामन्यात रिषभ पंतने धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला होता. त्याचबरोबर कोहलीनेही आता गोलंदाजीचा सराव केला आहे. त्यामुळे हा फायनलचा सामना चांगलाच रंगतदार होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zhBpwB
No comments:
Post a Comment