नवी दिल्ली : भारताच्या एका सुंदर मुलीबरोबर पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अलीने लग्न केलं. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. पण या लग्नानंतर आता हसन अलीने लग्नानंतर आपल्या बायकोचे कौतुक केले आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घ्या...हसन अली हा सध्याच्या घडीला पाकिस्तान प्रीमिएर लीगमध्ये इस्लामाबाद संघाकडून खेळत आहे. ही स्पर्धा सुरु असताना हसनच्या खासगी आयुष्यात एक वादळ आलं होतं. त्यामुळे हसन अलीने ही स्पर्धा सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण हसन अलीला हा निर्णय आपल्या पत्नीमुळे बदलावा लागला. हसन अलीच्या पत्नीने त्याला ग्वाही दिली की, ही समस्या मी सोडवते, तु फक्त तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत कर. त्यामुळे आता हसन अलीने पीएसएलमधून माघार घेण्याचा निर्णय रद्द केला असून तो आता ही स्पर्धा खेळणार आहे. ही भारताची सुंदरी आहे तरी कोण, पाहा...पाकिस्तानच्या क्रिकेटपटूबरोबर भारताच्या कोणत्या सुंदर मुलीने लग्न केलं आहे, याची उत्सुकता तुम्हालाही असेल. ही मुलगी आहे शामिया आरजू. हसन आणि शामिया यांनी २० ऑगस्ट २०१९ ला लग्न केलं होतं. हे लग्न दुबईमधील अटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये झाले होते. शामिया ही हरयाणामधील नुह या शहरातील आहे. शामिया ही एयर अमीरातमध्ये फ्लाइट इंजीनियर होती. त्यानंतर शामियाने हसन अलीबरोबर लग्न केलं. हसन अली नेमकं काय म्हणाला, पाहा...शामियासारखी बायको असायला नशिब लागतं. कारण शामियासारखी बायको नसली असती तर मला ही स्पर्धा सोडून घरी परत जावे लागले असते. पण शामियाने मला आश्वासन दिले आहे की, ती सर्व परिस्थिती हाताळणार आहे. त्याचबरोबर तिने मला आपल्या करीअरवर लक्ष केंद्रीत करायलाही सांगितले आहे. त्यामुळे शामियासारखी बायको मिळाल्यामुळेच माझी चिंता दूर झाली आहे. त्यामुळे तिच्या सांगण्यावरूनच मी आता पीएसएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे, असे हसन अलीने यावेळी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35iRkgf
No comments:
Post a Comment