Ads

Tuesday, June 22, 2021

धक्कादायक... विराट कोहली आणि रोहित शर्मामधले भांडण अजून संपलेले नाही, पाहा हा व्हिडीओ....

साऊदम्पटन : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये अजूनही भांडण सुरु असल्याचे म्हटले जात होते. पण या गोष्टीचा व्हिडीओच आता पुढे आला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली आणि रोहित नेमकं काय करत आहेत, पाहा... सध्याच्या घडीला फायनल सुरु आहे आणि या फायनलमधला एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि रोहित एकत्रपणे मैदानात उभे आहेत. पण एकत्र उभे असतानाही हे दोघे एकमेकांशी नजरही भिडवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हे दोघे एकमेकांबरोबर कोणताही संवाद साधताना दिसत नाहीत. या दोघांनी एकमेकांकडे पाठ केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोहली आणि रोहित यांच्यामधील भांडण अजूनही संपलेले नसल्याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. विराट कोहलीकडून आजच्या दिवशी पुन्ही कोणती घडली चुक, पाहा.... सामन्याच्या पाचव्या दिवशीही कोहलीने यावेळी गोलंदाजीची सुरुवात इशातं शर्मा आण जसप्रीत बुमरा यांच्याकडून केली. यावेळी इशांतने गोलंदाजी करताना ऑफ स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकले, त्यामुळे त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले. पण त्यावेळी जर शमीच्या हाती चेंडू दिला असता तर भारतीय संघाला लवकर विकेट मिळवण्याची दाट शक्यता होती. कारण शमी हा फलंदाजानुसार गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो फलंदाजाच्या शरीराच्या जवळ जास्त गोलंदाजी करतो आणि त्यावेळी विकेट मिळण्याची जास्त संधी असते. हे सर्व समीकरण पाहता कोहलीने आपल्या गोलंदाजीची सुरुवात शमीकडून करायला हवी होती, जर तसे झाले असते तर कदाचित आताचे चित्र वेगळे असले असते. कोहलीने ही चुक सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही केली होती आणि त्यावेळी भारताला लवकर विकेट मिळवता आले नव्हते. तीच चुक कोहलीने पुन्हा एका आज केल्याचे पाहायला मिळाले. आज भारतीय संघाला पहिली विकेट ही शमीनेच मिळवून दिली. त्यामुळए शमीला जर पहिली गोलंदाजी दिली असती तर भारताला लवकर यश मिळू शकले असते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35Hoeaq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...