नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत पाकिस्तानच्या खेळाडूने एक मोठा खुलासा केला आहे. यावेळी या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने आपल्या लग्नाची आठवण काढत गांगुली यांच्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू यासिर अराफत हा जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. पण जुन्या आठवणींना उजाळा देत असताना त्याने गांगुलींबाबत खुलासा केला आहे. यासिरने सांगितले आहे की, " सौरव गांगुली ही एक विनम्र व्यक्ती आहे. त्यांच्या चाहत्यांना कदाचीत ही गोष्ट माहिती नसेल की, ते माझ्या लग्नाला आले होते. मी गांगुली यांना विनंती केली होती. त्यावेळी गांगुली हे कामामध्ये व्यस्त होते. पण तरीही ते माझ्या लग्नाला पोहोचले होते." यासिरचे लग्न नेमके कुठे झाले नाही, हे अजून समजलेले नाही. पण हे लग्न जर पाकिस्तानमध्ये झाले असेल तर गांगुली पाकिस्तानमध्ये गेल्याचे स्पष्ट होऊ शकेल. एकीकडे बीसीसीआय पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका खेळू इच्छित नाही. पण दुसरीकडे जर गांगुली जर पाकिस्तानमध्ये गेले असतील तर यावर वाद होऊ शकतो आणि गांगुली यांची कदाचित अडचणही वाढू शकते. गांगुली जर पाकिस्तानात गेले असतील तर त्यांना काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता या गोष्टीत पुढे नेमकं काय समजतं, हे पाहणे महत्वाचे असेल. यावेळी यासिर म्हणाला की, " मी बऱ्याच क्रिकेटपटूंना माझ्या लग्नाचे आमंत्रण दिले होते, पण बरेच जण आले नाहीत. पण सौरव गांगुली हे त्यापैकी नक्कीच नव्हते. कारण त्यांनी माझ्यासारख्या क्रिकेटपटूसाठी वेळ काढला होता."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RPjY5E
No comments:
Post a Comment