Ads

Friday, June 4, 2021

डेव्हिड वॉर्नर बनला आता टायगर श्रॉफ, भन्नाट डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आपल्या व्हिडीओसाठी जग्रसिद्ध आहे. आता तर वॉर्नर चक्क बॉलीवूडचा स्टार टायगर श्रॉफ बनल्याचे पाहायला मिळाले आहे. वॉर्नरचा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. सध्याच्या घडीला वॉर्नरचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. टायगरचा स्टुडंट ऑफ द इयर-२ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटातील टायगरच्या एका गाण्यावर वॉर्नर यावेळी तुम्हाला नाचताना दिसू शकेल. वॉर्नरचे व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध होत असतात आणि त्यावर बऱ्याच कमेंट्सही येत असतात. पण हा व्हिडीओ पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही कमेंट केली आहे. वॉर्नरने यावेळी आपण हा व्हिडीओ लोकांच्या मागणीनंतर बनवला असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये #india आणि #WhoamI असेही लिहिले आहे. वॉर्नर फेस स्वॅपकरुन हा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून ब्रेट ली याला हसू आवरता आले नाही आणि त्याने तसाच एक इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. त्याचबरोबर वॉर्नरची पत्नी कँडीसलादेखील हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. क्रिकेट चाहत्यांनीही या व्हिडीओची स्तुटी केली आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. वॉर्नर मायदेशात परतल्यावर त्याचे व्हिडीओ पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. वॉर्नर हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळत होता. या संघाचा कर्णधारही तो होता. पण आयपीएलचे काही सामने झाल्यावर मात्र वॉर्नरकडून संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्याचबरोबर वॉर्नरला संघाबाहेरही काढण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना या सर्व गोष्टींचा धक्का बसला होता. यावर्षी आयपीएल करोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली आणि त्यामध्ये सर्वात जास्त हाल ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे झाले. कारण ऑस्ट्रेलियाने यावेळी विमानबंदी जाहीर केली होती. त्यामुळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना थेट आपल्या देशात जाता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी यावेळी मालदिव या देशाचा आसरा घेतला होता. मालदिवमध्ये बरेच दिवस क्वारंटाइन झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनी येथे पोहोचले होते. पण सिडनीमध्ये पोहोचल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागले. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या कुटुंबियांना भेटल्याचे पाहायला मिळाले. पण आता जास्त काळ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आपल्या कुटुंबियांबरोबर राहता येणार नाही. कारण जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये त्यांना क्रिकेट मालिका खेळायच्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gfO9v4

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...