नवी दिल्ली : भारताच्या ११ खेळाडूंच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीचा गेम प्लॅन सांगितला आहे. विराट कोहलीने संघ जाहीर झाल्यावर सांगितले की, " भारतीय संघ हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यातही आम्ही आक्रमक खेळ करणार आहोत. दोन्ही संघ चांगलेच समतोल आहेत आणि चांगला सामना होईल अशी आशा आहे. पण आम्ही जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही आक्रमकच असणार आहोत. बऱ्याच जणांना वाटत असेल की, आमच्यावर भरपूर दडपण असेल. कारण हा फायनलचा सामना आहे. पण ही गोष्टी खरी नाही. कोणताही सामना करो या मरो यासारखा नसतो. आमच्यासाठी हा एक कसोटी सामना आहे, जो जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत." कोहलीने पुढे सांगितले की, " आम्ही जेव्हा सराव केला होता, तेव्हा वातावरणामध्ये गर्मी होती, पण आता वातावरण चांगलेच थंड झाले आहे. इंग्लंडमध्ये वातावरण सारखे बदलत असते. पण यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही जर या सामन्यात पराभूत झालो किंवा विजयी ठरलो तर क्रिकेट थांबणारे नाही. हा सामना सर्वोत्तम संघ कोणता आहे, यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही गेल्या ४-५ वर्षांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याचबरोबर बरेच विजय मिळवले आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत." भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांवर नजर टाकली तर टीम इंडियाचे पारडेच जड दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. या ५९ कसोटी सामन्यांमध्ये भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला १२ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. या ५९ सामन्यांपैकी २६ सामने हे अनिर्णीत राहीलेले आहेत. त्यामुळे कसोटीतील आकडेवारीचा विचार करता भारताचे पारडे हे न्यूझीलंडपेक्षा जड आहे. त्यामुळे या फायनलमध्येही भारत विजय मिळवणार का, याची उत्सुकताच सर्वांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iKGffX
No comments:
Post a Comment