नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सामना सुरु असतानाच गोलंदाज पंचांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. या गोलंदाजाने नेमकं केलं तरी काय, हे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...सामना चांगलाच रंगतदार सुरु असताना एक खेळाडू गोलंदाजी करत होता. त्या गोलंदाजाने चेंडू टाकला आणि तो फलंदाजाच्या पायाला लागला. त्यानंतर या खेळाडूने पायचीतची अपील पंचांकडे केली. पण पंचांनी यावेळी फलंदाजाला नाबाद ठरवले. त्यानंतर गोलंदाज चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. गोलंदाजाला यावेळी राग अनावर झाला आणि त्याने थेट स्टम्पलाच लाथ मारली. त्यानंतर हा गोलंदाज पंचांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नेमकं घडलं काय होतं, हे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या ढाका प्रीमिअर लीग ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शकिब अल हसन खेळत होता. शकिब यावेळी मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबकडून प्रतिस्पर्धी संघातील मुशफिकर रहिमला गोलंदाजी करत होता. यावेळी शकिबचा एक चेंडू हा रहिमच्या पॅडवर आदळला. फलंदाज बाद असल्याचे यावेळी शकिबला वाटले आणि त्याने जोरदार अपील केली. पण मैदानातील पंचांनी ही अपील फेटाळली आणि फलंदाजाला नाबाद ठरवले. त्यानंतर शकिब चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. शकिबने यावेळी रागाच्या भरात स्टम्पला लाथ मारली आणि त्यानंतर तो पंचांच्या अंगावर धावून गेला. शकिब आता काही तरी गंभीर गोष्ट करणार असे वाटत होते. पण त्याचवेळी संघातील खेळाडू पंचांच्या ठिकाणी जमा झाले आणि हे सर्व प्रकरण शांत करण्यात आले. पण शकिबने यावेळी जी गोष्ट केली ती क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळाला शोभा देणारी नक्कीच नव्हती. शकिबने जे कृत्य केले ते नक्कीच क्रिकेटला शोभा देणारे नक्कीच नव्हते. शकिबसारख्या अनुभवी खेळाडूकडून असे वागणे नक्कीच योग्य नसल्याची प्रतिक्रीया क्रिकेट विश्वात उमटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wfzCpX
No comments:
Post a Comment