नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडने यजमान इंग्लंडला धुळ चारली आहे. हा इंग्लंडबरोबरच भारतीय संघाला बसलेला जोरदार धक्का आहे. न्यूझीलंडच्या या विजयामुळे आता भारताची चिंता नक्कीच वाढलेली असेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने फक्त १२२ धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ३८ धावांची गरज होती आणि त्यांनी हे आव्हान लीलया पेलत सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे. न्यूझीलंडने हा सामना आठ विकेट्स राखत जिंकला आणि मालिका १-० अशी खिशात टाकली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला फायनलपूर्वीच जोरदार धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा संघ यजमान असेलल्या इंग्लंडशी अशी दयनीय अवस्था करू शकतो, तर भारतीय संघाचा कसा निभाव लागणार, याच चिंतेमध्ये भारताचे चाहते असतील. कारण न्यूझीलंड आता दुसरा कसोटी सामना इंग्लंडमध्ये खेळत आहेत आणि ते चांगल्या लयीत आले आहेत. दुसरीकडे भारतीय संघ गेल्या कित्येक दिवसांपासून कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांना लयीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे भारतासाठी फायनलमध्ये न्यूझीलंडशी दोन हात करणे नक्कीच सोपे नसेल. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कहर केल्याचेच पाहायला मिळाले. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अचूक आणि भेदक गोलंदाजी करत त्यांचा धुव्वाच उडवला. न्यूझीलंडच्या या तिखट गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडची एकही धाव झालेली नसताना त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत इंग्लंडची ७ बाद ७६ अशी दयनीय अवस्था केली होती. दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची ९ बाद १२२ अशी अवस्था होती आणि त्यांच्याकडे फक्त ३७ धावांची आघाडी होती. आज इंग्लंडला एकही धाव करताआली नाही आणि त्यांचा दुसरा डाव हा १२२ धावांवरच गुंडाळला गेला. न्यूझीलंडकडून यावेळी मॅट हेन्री आणि निल वॅगनर यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pOdcJI
No comments:
Post a Comment