मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या पाच दिवसापैकी दोन दिवस पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. यामुळे आयसीसीच्या नियमानुसार आज (२३ जून) राखीव दिवशी देखील खेळ होणार आहे. भारताचा दुसरा डाव सुरू असून त्यांनी ३२ धावांची आघाडी घेतली आहे. अखेरच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होणार असून दोन्ही संघांना विजय मिळवण्याची संधी आहे. वाचा- भारताचा कर्णधार याला आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्याच्याकडे आज जेतेपदाचा हा दुष्काळ दुर करण्याची संधी आहे. भारताने वेगाने धावा करून २००च्या आसपास टार्गेट दिले आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या १० विकेट घेतल्या तर ऐतिहासिक असा विजय मिळवता येईल. संपूर्ण क्रिकेट विश्व या लढतीकडे उत्सुकतेने पाहत असताना आज अखेरच्या दिवशी विराट कोहली किंवा भारतीय संघाच्या ऐवजी माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची चर्चा होत आहे. वाचा- सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये धोनी अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघ साउदम्प्टन येथे फायनल खेळत असताना चाहते मात्र टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या एका चॅम्पियनशिप विजेतेपदाची चर्चा करत आहे. आजच्या दिवशी २०१३ साली भारताने इंग्लंडचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. वाचा- वाचा- चा व्हिडिओ इंग्लंडमध्ये झालेल्या फायनल सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १२९ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल इंग्लंडला २० षटकात ८ बाद १२४ धावा करता आल्या. अखेरच्या चेंडूवर इंग्लंडला सहा धावांची गरज होती आणि आर अश्विन गोलंदाजी करत होता. या चेंडूवर इंग्लंडच्या फलंदाजांना धाव घेता आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदासह आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला कर्णधार ठरला होता. भारताच्या त्या जेतेपद विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. विराटने फायनलमध्ये भारताकडून सर्वाधिक ४३ धावा केल्या होत्या. वाचा- खेळल्या आज आठ वर्षांनी भारतीय संघाला पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे. गेल्या आठ वर्षात दोन वेळा भारतीय संघाला आयसीसीच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता विराट कोहली धोनी प्रमाणे २३ जून रोजी पुन्हा एकदा इतिहास घडवतो का याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना लागली आहे. पाहा व्हिडिओ- फायनल सामन्याचा संपूर्ण व्हिडिओ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zOUTca
No comments:
Post a Comment