लॉर्ड्स: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. ऐतिहासिक अशा लॉर्ड्स मैदानावर पहिल्या कसोटीला सुरूवात झाली. या मालिकेत न्यूझीलंडची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. कारण त्यानंतर ते भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहेत. तर इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वाचा- या सामन्यात इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम माजी कर्णधार अॅलेस्टर कुकच्या नावावर आहे. त्याने देखील प्रमाणे इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले आहेत. या मालिकेत जेव्हा तो दुसरी कसोटी खेळेल तेव्हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम त्याच्या एकट्याच्या नावावर जमा होईल. वाचा- जेम्स अँडरसन इंग्लंडमध्ये घरच्या मैदानावर ९०वा कसोटी सामना खेळत आहे. याबाबत त्याने कुक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांचा विक्रम मागे टाकला. कुक आणि वॉ यांनी घरच्या मैदानावर ८९ कसोटी खेळल्या होत्या. घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने ९४ सामने भारतात खेळले आहेत. तर रिकी पॉन्टिंगने ९२ सामने खेळले आहेत. वाचा- पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लडने या सामन्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. जेम्स ब्रेसी आणि ओली रॉबिन्स यांनी पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३१ षटकात २ बाद ९२ धावा केल्या होत्या. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34Eco0e
No comments:
Post a Comment