Ads

Friday, December 4, 2020

IND vs AUS T20: टी-२० मध्ये भारतच किंग; ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून फलंदाजीत रविंद्र जडेजाने तर गोलंदाजीत त्याच्या जागेवर खेळण्यास आलेल्या युजवेंद्र चहरने केलेल्या शानदार कामगिरी केली आणि विजय मिळून दिला. वाचा- भारताने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. कर्णधार फिंच आणि शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली. बदली खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाच्या जागी संघात आलेल्या युजवेंद्र चहलने फिंचला बाद केले. हार्दिक पांड्याने शानदार कॅच घेतला. त्यानंतर धोकादायक स्टीव्ह स्मिथला १२ धावांवर बाद करून भारताच्या वाटेतील मोठा अडथळा दूर केला. संजू सॅमसनने त्याचा सुपर कॅच घेतला. त्यानंतर स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला टी नटराजनने माघारी पाठवले. मॅक्सवेल २ धावा करून बाद झाला. वाचा- ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ७० अशी असताना डार्सी शॉर्ट आणि हेनरिकेस यांनी ऑस्ट्रेलियाला शतक पूर्ण करून दिले. ही जोडी डोकेदुखी ठरले असे वाटत असताना नटराजनने शॉर्टला ३४ धावांवर बाद करून मोक्याच्या क्षणी विकेट मिळून दिली. त्यानंतर चहलने पुन्हा एकदा कमाल केली. गुगली चेंडूवर मॅथ्यू वेडची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. दीपक चाहरने हेनरिकेसची विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या नियमत फलंदाजाला माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाला २० षटकात ७ बाद १५० धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून चहलने २५ धावा देत ३ विकेट, टी नटराजनने ३० धावा देत ३ तर दीपक चाहरने एक विकेट घेतली. अचानक संघात स्थान मिळवणाऱ्या चहलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. वाचा- त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शिखर पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिखर सहा चेंडूत फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ९ धावाकरून माघारी परतला. विराटच्या जागी आलेल्या संजू सॅमसनला मोठी संधी होती. त्याने राहुल सोबत काही फटकेबाजी केली. पण २३ धावांवर तो बाद झाला. सॅमसनच्या जागी आलेल्या मनिष पांडेने निराश केले. तो दोन धावा करून बाद झाला. दरम्यान केएल राहुलने ३७ चेंडू ५० धावा केल्या. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल ५१ धावांवर बाद झाला. वाचा- ... राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VBG7m7

India vs Australia 1st T20 Latest Update 2020: पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या मालिकेत पराभव झालेल्या भारतीय संघाची आज टी-२० मोहिम सुरू होणार आहे. कॅनबेरा येथे आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-२० सामना होणार असून या लढतीत भारताचे पारडे जड आहे. भारतीय संघाची टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियामधील कामगिरी शानदार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील Live अपडेट (India vs Australia )वाचा- >> पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय >> विकेट! दीपक चाहरने घेतली हेनरिकेसची विकेट; ऑस्ट्रेलिया ६ बाद १२६ >> चहलची गुगली! मॅथ्यू वेड बाद, ऑस्ट्रेलिया ५ बाद ११२ >> विकेट! नटराजनने डार्सी शॉर्टला केले बाद; ऑस्ट्रेलिया ४ बाद ११३ >> १४ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १०४ धावा >> १२ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद ८५ धावा >> भारताला मिळाली मोठी विकेट, नटराजनने घेतली मॅक्सवेलची विकेट; ऑस्ट्रेलिया ३ बाद ७५ >> पुन्हा चहलची जादू, संजू सॅमसनने घेतला शानदार कॅच; स्मिथ बाद, ऑस्ट्रेलिया २ बाद ७२ >> बदली खेळाडू चहलने घेतली एरॉन फिंचची विकेट, ऑस्ट्रेलिया १ बाद ५६ >> चहलने मिळून दिली पहिली विकेट, हार्दिक पांड्याने घेतला सुपर कॅच >> विराट कोहलीने सोडला कॅच >> ६ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ५३ धावा>> ४ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३३ धावा >> २ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या १६ धावा >> ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात >> रविंद्र जडेजाची धमाकेदार फलंदाजी, पहिल्या टी-२०मध्ये भारताच्या ७ बाद १६१ धावा >> हार्दिक पांड्या १६ धावांवर बाद, भारत ६ बाद ११४ >> १६ षटकानंतर भारताच्या ५ बाद १०४ धावा >> भारताला आणखी एक झटका, राहुल ५१ धावांवर बाद >> भारताची आणखी एक विकेट, मनिष पांडे बाद; भारत ४ बाद ९०>> संजू सॅमसन २३ धावावर बाद, भारत ३ बाद ८६>> केएल राहुलचे अर्धशतक, ३७ चेंडूत केल्या ५० धावा >> १० षटकानंतर भारताच्या २ बाद ७५ धावा >> ८ षटकानंतर भारताच्या २ बाद ५६ धावा >> मोठी विकेट! विराट कोहली ९वर बाद, भारत २ बाद ४८>> ६ षटकानंतर भारताच्या १ बाद ४२ धावा >> ५ षटकानंतर भारताच्या १ बाद ३० धावा >> ४ षटकानंतर भारताच्या १ बाद २१ धावा >> भारताला पहिला धक्का, शिखर धवन १ धाव करून बाद; भारत १ बाद ११ >> २ षटकानंतर भारताच्या ६ धावा >> केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली भारताच्या डावाला सुरूवात >> भारताकडून टी नटराजन टी-२० मध्ये पदार्पण करणार >> India vs Australia 1st T20: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> भारताने खेळलेल्या त्यांच्या गेल्या आठच्या आठ टी-२० लढतीत विजय मिळवला आहे. यातील दोन लढती सुपर ओव्हरमध्ये जिंकल्या होत्या. >> ऑस्ट्रेलियाने २०१९ पासून १३ पैकी १० टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. >> भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया ९ टी-२० सामने खेळले आहेत त्यापैकी ५ मध्ये विजय मिळवला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33FLjtO

धक्कादायक... सामन्याच्या दिवशीच खेळाडूला झाला करोना, लढत करावी लागली रद्द

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील एक धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. कारण सामन्याच्या दिवशीच एका क्रिकेटपटूला करोना झाल्याचे पाहायला मिळाले. आज खेळवण्यात येणारा सामना रद्द करावा लागला. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार होती. आज, शुक्रवारी या मालिकेतील पहिला वनडे सामना होणार होता. पण सामन्याच्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना होणार होता. पण या सामन्यापूर्वी खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या खेळाडूला थेट हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. पण आजचा सामना रद्द करावा लागला. हा सामना आता ६ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनला एक कोडवर्डमध्ये मेसेज आला. हा मेसेज आल्यावर क्रिकेट विश्वामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या मेसेजनंतर इंग्लंडच्या एका माजी कर्णधाराने संघाला घरचा अहेर दिल्याचेही पाहायला मिळाले. नेमके घडले तरी काय...दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या १९व्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला. इंग्लंडच्या संघाचे अॅनलिस्ट असलेले नॅथन लेमन हे ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी त्यांनी मॉर्गनकडे पाहून एक कार्ड दाखवले. या मोठ्या कार्डवर 4Eआणि 2C असे लिहिलेले होते. लेमन यांनी हा मेसेज देताना सर्वांनी पाहिले, पण या मेसेजचा नेमका अर्थ काय, हे मात्र कोणाला समजू शकले नव्हते. हा मेसेज नेमका कशासाठी होता, हेदेखील कोणाला समजू शकले नाही. या मेसेजनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. कारण असा मेसेज देणे हे नियमांमध्ये बसते का, हा सवाल आता उठायला सुरुवात झाली आहे. ... असा कोडवर्डमध्ये मेसेज पाठवणे नियमांमध्ये बसते का?याबाबत मार्क वूड या इंग्लंडच्या खेळाडूने सांगितले की, " ही गोष्ट सामनाधिकाऱ्यांनाही माहिती होती. त्यांनी यावर कोणताही आक्षप घेतलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट नियमांमध्ये बसणारीच आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VBN9r5

IND vs AUS : संघात नसलेल्या युजवेंद्र चहलने केली गोलंदाजी, भारताला मिळाला नव्या नियमाचा फायदा

कॅनबेरा : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला आजच्या सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण तरीही तहल आजच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आपल्या पहिल्याच षटकात चहलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला बाद करत भारताला मोठे यशही मिळवून दिले. पण चहलने या सामन्यात गोलंदाजी केली, कारण आयसीसीच्या नव्या नियमांचा चांगलाच फायदा यावेळी भारतीय संघाला झाला. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. कारण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली. काय सांगतो आयीसीसीचा नवा नियम...आयसीसीच्या नव्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी बदली खेळाडू संघात येऊ शकतो. जो खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, त्याच्याजागी हा बदली खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो. या नव्या नियमानुसार जडेजा दुखापतग्रस्त झाल्यावर चहलला संघात स्थान देण्यात आले. चहलने या संधीचे सोने करत पहिल्याच षटकात भारताला मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले. राहुल वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमवल्या त्यामुळे मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या करता आली. राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mKnsAv

IND vs AUS : भारताला मोठा धक्का, रवींद्र जडेजाला झाली गंभीर दुखापत

कॅनबेरा : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याचे समजते आहे. क्रिकइन्फो या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे. जडेजा या सामन्यात गोलंदाजी करणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण जडेजाच्या जागी आता युजवेंद्र चहल गोलंदाजी करू शकतो, असे म्हटले जात आहे. भारताचा डाव या सामन्यात अडचणीत सापडला होता. कारण भारतीय संघाची या सामन्यात ५ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी जडेजाने धडाकेबाज फलंदाजी केली. जडेजाने यावेळी २३ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. पण ही खेळी झाल्यावर जडेजाला दुखापत झाली असल्याची माहिती क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिली आहे. त्यामुळे जर जडेजाला दुखापत झाली असेल आणि ती गंभीर स्वरुपाची असेल तर त्याला या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. याबाबतची कोणतीही माहिती बीसीसीआय किंवा भारतीय संघाने दिलेली नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे, हे पाहायला लागेल. जर जडेजाची दुखापत गंभीर नसेल तर तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पुन्हा खेळू शकतो. पण जर त्याची दुखापत जर गंभीर असेल तर त्याला ऑस्ट्रेलियामध्ये एकही सामना खेळता येणार नाही. रोहित शर्माचेही पायांचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले. राहुल वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमवल्या त्यामुळे मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या करता आली. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शिखर पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिखर सहा चेंडूत फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ९ धावाकरून माघारी परतला. दरम्यान केएल राहुलने ३७ चेंडू ५० धावा केल्या. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल ५१ धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3onmlqN

IND vs AUS T20: जडेजाची स्फोटक फलंदाजी, भारताला तारले; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये टीम इंडियाच्या १६१ धावा

कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने ७ बाद १६१ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलकडून अर्धशतक केले. राहुल वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताने सातत्याने विकेट गमवल्या त्यामुळे मोठी धावसंख्या करता आली नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या काही षटकात फटकेबाजी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या करता आली. वाचा- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शिखर पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिखर सहा चेंडूत फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ९ धावाकरून माघारी परतला. विराटच्या जागी आलेल्या संजू सॅमसनला मोठी संधी होती. त्याने राहुल सोबत काही फटकेबाजी केली. पण २३ धावांवर तो बाद झाला. सॅमसनच्या जागी आलेल्या मनिष पांडेने निराश केले. तो दोन धावा करून बाद झाला. दरम्यान केएल राहुलने ३७ चेंडू ५० धावा केल्या. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल ५१ धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिसऱ्या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JG9PUl

क्रिकेटपटूची मुलगी गंभीर, रुग्णालयात दाखल; स्पर्धा अर्ध्यावर सोडून घरी आला...

नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सध्या स्पर्धेत खेळत आहे. पण ही स्पर्धा सोडून तो पुन्हा घरी परतला. आफ्रिदी गाले ग्लेडिएटर्स या संघाचे नेतृत्व करत होता. अचानक त्याने LPLमधून माघार घेतली. वाचा- आफ्रिदीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात त्याने वैयक्तीक कारणामुळे मायदेशात परत असल्याचे सांगितले. आफ्रिदीसोबत लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या सोशल मीडियावर आफ्रिदी आणि त्याच्या मुलीचा रुग्णालयातील फोटो शेअर केला गेला आहे. दुर्दैवाने काही वैयक्तीक कारणामुळे मी घरी जात आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर मी पुन्हा LPLमध्ये सहभागी होईन. ऑल द बेस्ट! वाचा- आफ्रिदीच्या या ट्वीटनंतर लंका प्रीमीयर लीगने ट्वीटवर एक फोटो शेअर केला ज्यात आफ्रिदी आणि त्याची मुलगी दिसत आहे. हा फोटो रुग्णालयातील आहे. वाचा- जर आफ्रिदी खरच पुन्हा लीग खेळण्यासाठी आला तर त्याला काही दिवस क्वारंटाइन रहावे लागले. आफ्रिदी प्रमाणेच दांबुला वाइकिंग संघाचा जलद गोलंदाज आफताब आलम देखील वैयक्तीक कारणामुळे अफगाणिस्तानला परत गेला आहे. श्रीलंकेचा जलद गोलंदाज लसित मलिंगा आणि पाकिस्तानचा विकेटकीपर सरफराज अहमदने लीग मधून माघार घेतल्याने आफ्रीदीकडे संघाचे नेतृत्व आले होते. आता तो ही उपलब्ध नसल्यामुळे उप कर्णधार भानुका राजपक्षेकडे गाले ग्लॅडिएटर्सचे नेतृत्व देण्यात आले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VDLSzP

IND vs AUS : भारतीय संघासाठी गूड न्यूज, तब्बल २४ दिवसांच्या क्वारंटाइननंतर हा सदस्य मैदानात उतरणार

कॅनबेरा, : भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतील संघातील एक सदस्य तब्बल २४ दिवसांच्या क्वारंटाइननंतर मैदानात उतरणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या सर्वात जवळची संघातील व्यक्ती असलेले थ्रोडाउन एक्सपर्ट डी राघवेन्द्र हे गेल्या २४ दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये होते. त्यानंतर आता त्यांना भारतीय संघाबरोबर सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी राघवेंद्र हे भारतीय संघाबरोबर सराव करताना दिसतील. कुठे फसलं होतं राघवेंद्र...सिडनी हेराल्ड या ऑस्ट्रेलियातील वर्तमापत्राने रघुवेंद्र यांच्याबाबतची माहिती दिली आहे. रघुवेंद्र हे ९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना सिडनी येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. कारण ऑक्टोबरमध्ये रघुवेंद्र हे करोना पॉझिटीव्ह सापडले होते. खरंतर एकदिवसीय मालिकेपूर्वी रघुवेंद्र यांना संघाबरोबर सराव करायचा होता. पण ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यावर रघुवेंद्र यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी पुन्हा एकदा रघुवेंद्र यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी हा १४ दिवसांपासून २४ दिवसांचा करण्यात आला होता. आता शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी रघुवेंद्र हे भारतीय संघाबरोबर सराव करताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. रघुवेंद्र हे १४० किलोमीटर प्रति तास या वेगाने चेंडू टाकतात. त्याचबरोबर ते चेंडू चांगला स्विंगही करतात आणि एका मिनिटामध्ये ते चार चेंडू टाकतात. त्यामुळे रघुवेंद्र यांची परदेशी दौऱ्यात संघाला नितांत गरज असते. रघुवेंद्र हे २०१४ सालापासून भारतीय संघाबरोबर आहे. त्याचबरोबर कर्णधार कोहलीचे ते आवडते आहेत. कोहलीने आपल्या यशामध्ये रघुवेंद्र यांचाही मोठा वाटा आहे, असे बऱ्याचदा सांगितले होते. रघुवेंद्र यांना दुखापतीमुळे क्रिकेटपटू होता आले नव्हते. पण भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून रघुवेंद्र हे भारतीय संघात सपोर्ट स्टाफ म्हणून दाखल झाले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37AUT2c

IND vs AUS : पहिल्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल, अव्वल गोलंदाज संघाबाहेर

कॅनबेरा, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले. कारण पहिल्या सामन्यातच भारताच्या महत्वाच्या गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर संघात ७ महत्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. पहिल्याच सामन्यात भारताने एवढे बदल केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आजच्या सामन्याच जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक जसप्रीत बुमराला संधी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर या संघातील दोन्ही अनुभवी फिरकीपटूंना स्थान देण्यात आलेले नाही. या संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आलेली नाही. चहलची पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये चांगलीच धुलाई झाली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या वनडे सामन्यात वगळण्यात आले होते. चहलच्या जागी कुलदीपला संधी देण्यात आली होती. कुलदीपने तिसऱ्या वनडेमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण कुलदीपला आजच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. पण या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर या युवा फिरकीपटूला स्थान देण्यात आलेले आहे. भारताने बुमराला आजच्या सामन्यात खेळवलेले नाही. पण त्याच्याजागी संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी दिली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बुमराने चांगली गोलंदाजी केली होती. पण बुमराला आजच्या सामन्यात संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आजच्या ट्वेन्टी-२० सामन्यात टी. नटराजनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. नटराजनचा हा पहिलाच ट्वेन्टी-२० सामना असेल. पहिल्या वनडे सामन्यातही नटराजनने चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारताच्या फलंदाजीमध्येटही मोठे बदल करण्यात आले आहे. भारतीय संघात यावेळी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आलेली नाही. पण भारताच्या फलंदाजीमध्ये मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना स्थान देण्यात आलेले आहे. मनीष यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, तर संजूला पाचवे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाने फार मोठे बदल केले आहेत. त्यामुळे या सामन्यात संधी मिळालेल्या खेळाडूंकडून नेमकी कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mGsBto

IND vs AUS : भारताच्या फलंदाजीचा प्लॅन नेमका कसा असावा, सुनील गावस्कर यांचा कानमंत्र

कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामन आज रंगत आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिली फलंदाजी करणार आहे. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी भारताच्या फलंदाजीबाबत एक प्लॅन सांगितला आहे. गावस्कर पुढे म्हणाले की, " माझ्यामते धवन आणि राहुल हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली सलामी करू शकतात. या दोघांनंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीने यायला हवे. पण जर १४-१५ षटकांपर्यंत जर दुसरी विकेट पडली तर हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात यावी. पण जर भारताच्या दोन विकेट्स पहिल्या सहा षटकांमध्ये पडल्या तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी द्यायला हवी." गावस्कर यांनी याबाबत सांगितले की, " खेळाडूंच्या फॉर्मचा विचार केला गेला तर शिखर धवनबरोबर लोकेश राहुलने सलामीला यायला हवे, असे मला वाटते. कारण या दोघांनीही आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती. राहुलने किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळताना ६७० धावा केल्या होत्या, त्यचाबरोबर धवनने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना ६१८ धावा केल्या होत्या. त्यामुळे माझ्यामते पहिल्या ट्वेनटी-२० सामन्यात धवन आणि राहुल यांनी सलामीला यायला हवे, असे मला वाटते." पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला का संधी देण्यात यावी, याबाबत गावस्करांनी सांगितले की, " भारताला जर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांची संघ निवड योग्य असायला हवी. माझ्यामते पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवायला हवे. कारण आतापर्यंत कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संधी द्यायला हवी, असे मला वाटते." कुलदीपला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात कुलदीपने ५७ धावा देत एक बळीही मिळवला होता. पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. पहिल्या सामन्यात चहलने सर्वाधिक ८९ धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या वनडेमध्ये चहलने ७१ धावा दिल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये महागडी गोलंदाजी केल्यानंतर चहलला तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळेच तिसऱ्या वनडेमध्ये कुलदीपला संधी मिळाली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39GxWxh

Thursday, December 3, 2020

IND vs AUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० भारताचे पारडे जड; हे आहे कारण

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने वनडे मालिका गमावली असली तरी अखेरच्या वनडेत विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला असेल. दोन्ही संघात आजपासून टी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. भारतीय संघ टी-२० मालिकेची सुरूवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका २-१ने जिंकली होती. ज्या मैदानावर भारताने वनडे लढत जिंकली होती तेथेच पहिली टी-२० लढत होत आहे. कॅनबेरा येथे भारताने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला होता. वाचा- टीम इंडियाने वनडे मालिका गमावली असली तरी ऑस्ट्रेलियामध्ये भारताची टी-२० मधील कामगिरी चांगली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत ९ टी-२० सामने खेळेल आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला. एका सामन्याचा निकाल लागला नाही. यातील विशेष बाब म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियात एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. वाचा- पहिल्या वनडेत पराभव झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडू टी-२० क्रिकेटमधून बाहेर पडले नाहीत, असे वक्तव्य केले होते. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील खेळाडूंसमोर एक मोठे आव्हान आहे म्हणजे ४८ तासात वनडे क्रिकेटमधऊन टी-२० क्रिकेटशी एकरुप होण्याचे. अर्थात भारतीय खेळाडूंना एका महिन्यापूर्वीच आयपीएल खेळली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्टी फार कठीण असणार नाही. वाचा- भारतीय संघाकडे टी-२० साठी वेगळी टीम आहे. १६ पैकी १४ असे खेळाडू आहेत जे वनडे संघात देखील होते. दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे टी-२० संघात आहेत. ऑस्ट्रेलियाने मात्र वनडे आणि टी-२० साठी एकच संघ ठेवला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3onRDhc

IND vs AUS: भारताच्या विजयात महेंद्रसिंग धोनीचा हात, रवींद्र जडेजाने केला मोठा खुलासा

कॅनबेरा, : भारताचा माजी कर्णधार हा भारतीय संघामध्ये नाही. आयपीएलपूर्वीच धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली होती. पण भारताने जो तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवला त्यामध्ये धोनीचाही हात होता, असा खुलासा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने केला आहे. तिसऱ्या वनडेमध्ये जडेजाला महत्वपूर्ण ५० चेंडूंत नाबाद ६६ धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर हार्दिक पंड्याबरोबर १५० धावांची भागीदारीही रचली. पण ही खेळी साकारताना धोनीने आतापर्यंत धोनीने जो पॅटर्न बनवला आहे, त्याचा मला चांगलाच फायदा झाला, असे जडेजाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. धोनीने नेमका कोणता पॅटर्न बनवला होता, पाहा.... जडेजा म्हणाला की, " धोनी भारत आणि चेन्नईच्या संघाबरोबर बराच काळ खेळला आहे. त्याच्याबरोबर मलाही खेळायची संधी मिळाली. धोनीचा एक फलंदाजीचा पॅटर्न आहे. धोनी ज्या फलंदाजाबरोबर खेळत असतो त्याच्याबरोबर त्याला मोठी भागीदारी करायला आवडते. त्याचबरोबर एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मोठे फटके मारायचे, हेदेखील धोनीनेच मला शिकवले. या गोष्टीचाच मला तिसऱ्या वनडेमध्ये फलंदाजी करताना चांगला फायदा झाला." जडेजाने पुढे सांगितले की, " धोनी नेहमी सांगायचा की, सामना अखेरच्या षटकांपर्यंत घेऊन जा आणि डेथ ओव्हर्समध्ये जोरदार फटकेबाजी करा. मी धोनीबरोबर फलंदाजी करताना या गोष्टी बऱ्याचवेळा पाहिल्या आहेत. अखेरच्या ५-६ षटकांमध्ये धोनी जबरदस्त फलंदाजी करायचा. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही काही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी मी धोनीचा हा पॅटर्न वापरला आणि त्यामध्ये मला यश मिळाले. कारण अखेरच्या ५-६ षटकांमध्ये आम्ही भरपूर धावा लुटल्या आणि त्यामुळेच आम्ही हा विजय साकारू शकलो, असे मला वाटते." भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36DZNfD

IND vs AUS: रोहित शर्माच्या दुखापतीबाबतचा घोळ नेमका कोणी वाढवला, पाहा...

कॅनबेरा, : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या दुखापतीबाबतचा घोळ हा चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला. रोहित शर्मासारख्या अनुभवी क्रिकेटपटूच्या दुखापतीबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला काहीच माहिती नव्हतं, असं त्यानेच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यामुळे हा घोळ नेमरा कोणी वाढवला ही गोष्ट आता पुढे आले आहे. रोहित हा संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. पण त्याच्या दुखापतीबाबत कर्णधाराला माहिती नसणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. पण या सर्व प्रकरणात काही जणांचे नक्कीच चुकलेले आहे, हे आता समोर आले आहे. रवी शास्त्री हे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांना संघातील सर्व खेळाडूंबाबत नक्कीच माहिती असते. पण जर रोहितच्या दुखापतीबाबत शास्त्री यांनी जर कोहलीला सर्व माहिती दिली असती तर सर्व जगापुढे रोहितच्या दुखापतीचा घोळ नक्कीच वाढला नसता, पण तसे झालेले दिसत तरी नाही. पण खरंच शास्त्री यांनी कोहलीला रोहितच्या दुखापतीबाबतची माहिती दिली नसेल का, याबाबत चाहत्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने सांगितले की, " रोहितच्या दुखापतीबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हते, असे कोहली सांगितले होते. पण रोहितच्या दुखापतीबाबतची माहिती रवी शास्त्री यांनी कोहलीला द्यायला हवी होती. कारण संघाची बांधणी करताना कर्णधाराला सर्व खेळाडूंबद्दल माहिती असणे गरजेचे असते. त्यामुळे शास्त्री यांनी जर कोहलीला रोहितच्या दुखापतीबाबतची माहिती दिली असती तर हा घोळ जास्त वाढला नसता." रोहितच्या दुखापतीबाबत कोहली म्हणाला होती की, " आयपीएल सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार होती. त्यासाठीच प्रशिक्षक आणि निवड समिती यांच्याशी संवाद साधण्यात आला होता. पण भारतीय संघाची निवड करण्याच्या दोन दिवसांपूर्वी आम्हाला एक इमेल आला. या इमेलमध्ये सांगण्यात आले होते की, रोहित शर्माला आयपीएल खेळताना दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या दुखापतीची सर्व माहिती रोहितला देण्यात आलेली आहे. त्याला आपल्या दुखापतीबद्दल आता सर्व माहिती आहे. त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी होणाऱ्या निवडीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g4iDzo

IND vs AUS: पहिल्या सामन्यात 'या' खेळाडूने धवनबरोबर सलामीला यायला हवं, सुनील गावस्कर यांचा सल्ला

कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना उद्या होणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत मोठी सलामी मिळालेली नाही. त्यामुळे या पहिल्या सामन्यात शिखर धवनबरोबर कोणत्या फलंदाजाने सलामीला यायला हवे, याचा सल्ला भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी दिला आहे. गावस्कर यांनी याबाबत सांगितले की, " खेळाडूंच्या फॉर्मचा विचार केला गेला तर शिखर धवनबरोबर लोकेश राहुलने सलामीला यायला हवे, असे मला वाटते. कारण या दोघांनीही आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती. राहुलने किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळताना ६७० धावा केल्या होत्या, त्यचाबरोबर धवनने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना ६१८ धावा केल्या होत्या. त्यामुळे माझ्यामते पहिल्या ट्वेनटी-२० सामन्यात धवन आणि राहुल यांनी सलामीला यायला हवे, असे मला वाटते." गावस्कर पुढे म्हणाले की, " माझ्यामते धवन आणि राहुल हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली सलामी करू शकतात. या दोघांनंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीने यायला हवे. पण जर १४-१५ षटकांपर्यंत जर दुसरी विकेट पडली तर हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात यावी. पण जर भारताच्या दोन विकेट्स पहिल्या सहा षटकांमध्ये पडल्या तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी द्यायला हवी." पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला का संधी देण्यात यावी, याबाबत गावस्करांनी सांगितले की, " भारताला जर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांची संघ निवड योग्य असायला हवी. माझ्यामते पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवायला हवे. कारण आतापर्यंत कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संधी द्यायला हवी, असे मला वाटते." कुलदीपला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात कुलदीपने ५७ धावा देत एक बळीही मिळवला होता. पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. पहिल्या सामन्यात चहलने सर्वाधिक ८९ धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या वनडेमध्ये चहलने ७१ धावा दिल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये महागडी गोलंदाजी केल्यानंतर चहलला तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळेच तिसऱ्या वनडेमध्ये कुलदीपला संधी मिळाली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Vy5w03

IND vs AUS: भारताचे दोन संघ एकाच दिवशी ऑस्ट्रेलियात मैदानात उतरणार

कॅनबेरा, : भारतीय संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये खेळत आहे. पण एकाच दिवशी भारताचे दोन संघ ऑस्ट्रेलियात मैदानात उतरणार असल्याचे पाहायला मिळू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये ६ डिसेंबरला भारताचे दोन संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार आहे. या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. त्याचबरोबर या दिवशीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 'अ' संघांमध्ये तीन दिवसीय सामना सुरु होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी सिडनीमध्ये दोन भारतीय संघ मैदानात उतरणार आहेत. याबाबतची माहिती क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या 'अ' संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज सीन अॅबॉटकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या या संघात जॅक्सन बर्ड, अॅश्टॉन अगर आणि जो बर्न्ससारखे खेळाडू असतील. पण भारताच्या 'अ' संघाबाबत अजून कोणतीही माहिती प्रसारीत झालेली नाही. त्यामुळे भारताच्या 'अ' संघात नेमके कोणते खेळाडू असतील, याबाबत चाहत्यांना उत्सुकता नक्कीच असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या पहिला ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात काही महत्वाचे बदल उद्याच्या सामन्यात होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. कारण भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियात वनडे मालिका गमावली आहे. पण अखेरच्या वनडे सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल ट्वेन्टी-२० मालिका खेळण्यापूर्वी चांगलेच उंचावलेले असेल आणि त्याचा फायदा संघाला होऊ शकतो. त्याचबरोबर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात काही बदल किंवा प्रयोग भारतीय संघात होऊ शकतात, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाता कोणाला संधी मिळते आणि कोणाला डच्चू यांची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37vTlGB

IND vs AUS: भारताला जिंकायचे असेल 'या' खेळाडूला खेळवायलाच पाहिजे, सुनील गावस्करांनी दिला कानमंत्र

कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना उद्या होणार आहे. भारताने वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे ही मालिका त्यांच्यासाठी महत्वाची असेल. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात जर भारताला विजय मिळवायचा असेल तर या खेळाडूला खेळवायलाच हवे, असा कानमंत्र भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी दिला आहे. गावस्करांनी याबाबत सांगितले की, " भारताला जर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांची संघ निवड योग्य असायला हवी. माझ्यामते पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवायला हवे. कारण आतापर्यंत कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संधी द्यायला हवी, असे मला वाटते." कुलदीपला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात कुलदीपने ५७ धावा देत एक बळीही मिळवला होता. पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. पहिल्या सामन्यात चहलने सर्वाधिक ८९ धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या वनडेमध्ये चहलने ७१ धावा दिल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये महागडी गोलंदाजी केल्यानंतर चहलला तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळेच तिसऱ्या वनडेमध्ये कुलदीपला संधी मिळाली होती. कुलदीपने या सामन्याच चहलपेक्षा फार कमी धावा दिल्या होत्या. त्यामुळे पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संघी मिळायला हवी, असे चाहत्यांनाही वाटत आहे. हार्दिक पंड्याने गोलंदाजी करावी की नाही...पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक गेले वर्षभर गोलंदाजी करत नव्हता. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकने गोलंदाजी केली होती आणि महत्वपूर्ण स्टीव्हन स्मिथचा बळीही मिळवला होता. हार्दिक पंड्याने गोलंदाजी करावी की नाही, याबाबत गावस्कर म्हणाले की, " माझ्यमते हार्दिक पंड्याने गोलंदाजी करायला हवी. हार्दिकने २-३ षटके तरी टाकायला हवीत, असे मला वाटते. कारण ही गोष्ट कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33DvH9Y

इंग्लंडच्या कर्णधाराला मिळाला कोडवर्डमधून मेसेज, क्रिकेट विश्वात उडाली एकच खळबळ

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनला एक कोडवर्डमध्ये मेसेज आला. हा मेसेज आल्यावर क्रिकेट विश्वामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या मेसेजनंतर इंग्लंडच्या एका माजी कर्णधाराने संघाला घरचा अहेर दिल्याचेही पाहायला मिळाले. नेमके घडले तरी काय...दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या १९व्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला. इंग्लंडच्या संघाचे अॅनलिस्ट असलेले नॅथन लेमन हे ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी त्यांनी मॉर्गनकडे पाहून एक कार्ड दाखवले. या मोठ्या कार्डवर 4Eआणि 2C असे लिहिलेले होते. लेमन यांनी हा मेसेज देताना सर्वांनी पाहिले, पण या मेसेजचा नेमका अर्थ काय, हे मात्र कोणाला समजू शकले नव्हते. हा मेसेज नेमका कशासाठी होता, हेदेखील कोणाला समजू शकले नाही. या मेसेजनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. कारण असा मेसेज देणे हे नियमांमध्ये बसते का, हा सवाल आता उठायला सुरुवात झाली आहे. ... असा कोडवर्डमध्ये मेसेज पाठवणे नियमांमध्ये बसते का?याबाबत मार्क वूड या इंग्लंडच्या खेळाडूने सांगितले की, " ही गोष्ट सामनाधिकाऱ्यांनाही माहिती होती. त्यांनी यावर कोणताही आक्षप घेतलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट नियमांमध्ये बसणारीच आहे." आयसीसीने याबाबतचा नियम बनवलेला आहे. त्यामुळे लेमन यापुढेही असे मेसेज संघाला पाठवू शकतात. यापूर्वी अशी कोणती घटना घडली आहे का?हो. यापूर्वी लेमन यांनी या कोडवर्डचा वापर पाकिस्तान सुपर लीगमध्ये केला होता. त्यावेळी ते मुलतान सुलतान्स या संघाचा एक भाग होते. प्रशिक्षक थेट मैदानात जाऊन खेळाडूंना मेसेज देऊ शकतात का?नाही. कोणतेही प्रशिक्षक थेट मैदानात जाऊन मेसेज देऊ शकत नाही. जर प्रशिक्षकाला कोणता मेसेज संघापर्यंत पोहोचवायचा असेल तर ते राखील खेळाडूला सांगू शकतात आणि तो खेळाडू मैदानात येऊन हा मेसेज देऊ शकतो. आयपीएलमध्ये जेव्हा टाइम आऊट असते तेव्हा मात्र प्रशिक्षक मैदानात आल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36Cqt06

IND vs AUS: रोहित शर्माच्या नावावर मैदानात न उतरताही झाला विक्रम, टीम इंडियाला टाकलं मागे

कॅनबेरा, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा खेळला नव्हता. पण मैदानात न उतरताही रोहितच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम रचताना रोहितने संपूर्ण टीम इंडियामधील सर्व खेळाडूंना मागे टाकले आहे. रोहित हा सध्याच्या घडाली आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकलेला नाही. पण तरीही रोहितच्या नावावर एक विक्रम जमा झाला आहे. या पूर्ण वर्षात रोहितसारखी कामगिरी कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही. कारण या वर्षात सर्वाधिक धावांची खेळी ही रोहितच्या नावावर आहे. त्यामुळे मैदानात न उतरताही रोहितच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहितने १९ जानेवारीला बंगळुरु येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ११९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. ही भारताच्या फलंदाजाकडून या वर्षात झालेली सर्वोत्तम खेळी आहे. त्यानंतर या यादीमध्ये दुसरा क्रमांक हा हार्दिक पंड्याचा लागतो. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये हार्दिकने नाबाद ९२ धावांची खेळी साकारली होती. पण रोहित शर्माचा या वर्षातील सर्वाधिक खेळीचा विक्रम मात्र अजूनही आबाधित राहिलेला आहे आणि त्याला कोणीही हात लावू शकणार नाही. कारण आता या वर्षामध्ये भारतीय संघ कोणताही एकदिवसीय सामना खेळणार नाही. कारण यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक खेळीचा विक्रम हा रोहितच्या नावावरच असणार आहे. रोहित हा सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. त्याचबरोबर ११ डिसेंबरला रोहितची फिटनेस चाचणी होणरा आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तर त्याला ऑस्ट्रेलिच्या दौऱ्यावर जाता येईल. पण रोहितला ऑस्ट्रेलियामध्ये कसे पाठवायचे आणि त्याला तिथे किती दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे, हे मात्र अजून ठरलेले नाही. पम रोहित जर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तर त्याचा फायदा नक्कीच भारतीय संघाला होऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JuyifC

IND vs AUS: उद्या रंगणार पहिला ट्वेन्टी-२० सामना, पाहा कोणाला मिळणार संधी

कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या पहिला ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात काही महत्वाचे बदल उद्याच्या सामन्यात होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर काही खेळाडूंनी उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात सलामीवीरापासून बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ट्वेन्टी-२० सामन्यात सलामीला लोकेश राहुल येऊ शकतो. कारण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये राहुल हा आतापर्यंत सलामीला आलेला आपण पाहत आहोत. त्यामुळे शिखर धवनबरोबर उद्याच्या सामन्यात राहुल सलामीला येईल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येईल. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी मात्र श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत मनीषला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एकही संधी दिलेली नाही. त्याचबरोबर श्रेयसला आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात मनीषला संधी मिळू शकते, अशी दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संजू सॅमसनलाही संधी मिळू शकते. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांना संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी नेमकी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न भारताच्या संघाला सोडवावा लागणार आहे. कारण चहलने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. पण कुलदीपने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यााचबरोबर जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांना उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकते. पण गेल्या सामन्यात शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजन यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्याचडबरोबर भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने करणार का, याची उत्सुकताही चाहत्यांना नक्कीच असेल. कारण भारताने वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० मालिका ते जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mBQEcK

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: भारताच्या ऐतिहासिक विजयात मुंबईकर शार्दुल ठाकूरने उचचला मोलाचा वाटा

कॅनबेरा, : भारताच्या या ऐतिहासिक विजयात मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलला या मालिकेत आज पहिल्यांदाच संधी मिळाली होती. शार्दुलने या संधीचे सोने करत संघाच्या विजयात चांगलाच हातभार लावला. संधीचे सोने कसे करून घ्यायचे, याचा उत्तम वस्तुपाठ आज शार्दुल सर्वांना दाखवून दिला. आतापर्यंत भारताची गोलंदाजी चांगली होत नव्हती. पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात शार्दुलने १० षटकांमध्ये ५३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. या तीन फलंदाजांमध्ये गेल्या दोन्ही सामन्यात शतके झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथचाही समावेश होता. शार्दुलने या सामन्यात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला फक्त सात धावांवर बाद केले. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्याचबरोबर दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा जो गॅप होता तो आता भारताने स्मिथला बाद करत भरून काढला आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे शार्दुलने आजच्या सामन्यात हा सर्वात मोठा धक्का ऑस्ट्रेलियाच्या संघाला दिला होता. कारण स्मिथ लवकर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला मोठी धावसंख्या रचता आली नाही आणि हेच भारताच्या विजयाचे महत्वाचे कारण ठरले. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही स्मिथने शतक झळकावत १०४ धावा केल्या होत्या. स्मिथच्या या दोन शतकी खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यांमध्ये ३५०पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारता आला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण आजच्या सामन्यात विजय मिळवत भारताने इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नव्हता. त्यामुळे भारताने या सामन्यात तब्बल १२ वर्षांनी पहिला-वहिला विजय मिळवलेला आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mJnPeR

IND vs AUS: तिसऱ्या वनडेतील विजयासह भारताने ऑस्ट्रेलियामध्ये रचला इतिहास

कॅनबेरा, : : तिसऱ्या एकदिवसीय सामन्या भारताने ऑस्ट्रेलियावर अखेर विजय साकारला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत भारतीय संघाला जे ऑस्ट्रेलियामध्ये करता आले नव्हते ते विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने करून दाखवले आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत होता. पण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नव्हता. त्यामुळे भारताने या सामन्यात तब्बल १२ वर्षांनी पहिला-वहिला विजय मिळवलेला आहे. भारताने आजच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी दमदार विजय साकारला. भारताने वनडे मालिका यापूर्वीच गमावली होती. पण या सामन्यात विजयासह इतिहास रचल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी भारताला कोणत्या संघाबरोबर पराभूत व्हावे लागले होते, पाहा.... या मैदानात भारताचा पहिला सामना २००८ साली श्रीलंकेबरोबर झाला होता. पावसामुळे हा सामना २९ षटकांचा खेळवण्याचे ठरले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २९ षटकांमध्ये १९५ धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने या सामन्यात सर्वाधिक नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. रोहितच्या या खेळीमुळेच भारताला श्रीलंकेला १९६ धावांचे आव्हान देता आले होते. पण भारताच्या डावानंतर पुन्हा एकदा पाऊस पडला आणि षटके कमी करण्यात आली. अखेर श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१६ साली या मैदानात पहिला सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी आरोन फिंचने १०७ धावांची खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनीही शतके झळकावली होती. पण भारताला आव्हानाचा पाठलाग करताना ३२३ धावाच करता आल्या आणि त्यांना २५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VtzimF

IND vs AUS: भारताने अखेर लाज राखली, तिसऱ्या वनडेमध्ये मिळवला धमाकेदार विजय

कॅनबेरा, : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे. भारताच्या ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला तो पदार्पण करणाऱ्या टी. नटराजनने. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेनला नटराजनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला यावेळी सर्वात मोठा धक्का दिला तो या सामन्यात प्रथम खेळणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्यामुळे शार्दुलने यावेळी भारताला मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज झटपट बाद झाले असले तरी कर्णधार आरोन फिंच मात्र चांगली फलंदाजी करत होता. फिंचने यावेळी आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाने यावेळी फिंचला शिखर धवनकरवी झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. फिंचने या सामन्यात सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. फिंच बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. मॅक्सवेलने यावेळी यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीबरोबर सहाव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली. पण कोहलीने यावेळी कॅरीला ३८ धावांवर असताना धावचीत करत ही जोडी फोडली. पण त्यानंतरही मॅक्सवेल हा दमदार फलंदाजी करत होता. भारताने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही. या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १२३ अशी होती. पण एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना एका बाजूने विराटने संयमी फलंदाजी सुरू ठेवली होती. या सामन्यात त्याने २३वी धाव पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा ३०० डावात १२ हजार धावांचा विक्रम मोडला. विराट मोठी खेळी करेल असे वाटत असताना जोश हेजलवुडने त्याला ६३ धावांवर बाद केले. या मालिकेत हेजलवुडने त्याला तिसऱ्यांदा बाद केले. विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी संघाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. भारताकडून सहाव्या विकेटसाठी झालेली ही तिसऱ्या क्रमांकाची भागिदारी ठरली. हार्दिकने ७६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ९६ तर रविंद्र जडेजाने ५० चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37tLPvQ

भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला इंग्लडने दिला झटका

नवी दिल्ली: भारताविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्याआधीच विजय मिळवला आहे. सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचे पारडे जड दिसत आहे. या सामन्याचा निकाल काही ही लागला तरी संघाने ऑस्ट्रेलियाला झटका दिला आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा टी-२० मालिकेत क्लीन स्वीप करून आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यांनी पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. मंगळवार झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने ९ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. टी-२० क्रमवारीत इंग्लंडचे २५ सामन्यात २७५ रेटिंग गुण झाले आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे २२ सामन्यात इतकेच गुण आहेत. पण इंग्लंडकडे ६ हजार ८७७ अंक तर ऑस्ट्रेलियाकडे ६ हजार ४७ अंक आहेत. या क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारताकडे २६६ रेटिंग गुण आहेत. चौथ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. इंग्लंडविरुद्ध मायदेशात मालिका गमावणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. भारत आणि यांच्यात वनडे मालिकेनंतर याच आठवड्यात टी-२० मालिका सुरू होणार आहे. त्या मालिकेनंतर क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ofynTg

हार्दिक-जडेजा करू शकतात मग बाकीच्यांना काय झाले? तिसऱ्या वनडेत केला विक्रम

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३०२ धावा उभ्या केल्या. भारताकडून आघाडी आणि मधळ्या फळीतील फलंदाजांनी नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आलेल्या आणि यांनी धमाकेदार खेळी करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. वाचा- हार्दिकने ७६ चेंडूत नाबाद ९२ तर जडेजाने ५० चेंडूत ६६ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. या कामगिरीसह त्यांनी एक खास विक्रम केला. भारताकडून सहाव्या विकेटसाठी १५०ची भागिदारी होण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताकडून सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रम स्टुअर्ट बिन्नी आणि अंबाती रायडू यांच्या नावावर आहे. त्यांनी २०१५ साली झिम्बाब्वे विरुद्ध १६० धावांची भागिदारी केली होती.युवराज सिंग आणि एमएस धोनी यांचा क्रमांक लागतो. त्यांनी २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध १५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर हार्दिक आणि जडेजा या जोडीचा क्रमांक लागतो. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५० धावांची भागिदारी केली. वाचा- हार्दिकने आज ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या. वनडेतील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर जडेजाने ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. या दोघांमुळे भारताला ३०२ पर्यंत मजल मारता आली. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Vswkik

मैदानात राडा घालणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर युवा खेळाडूचा पलटवार, म्हणाला...

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी मैदानात चांगलाच राडा घातला होता. पण आता एका युवा गोलंदाजाने आफ्रिदीवर जहरी टीक केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यात आफ्रिदीला भोपळाही फोडता आला नव्हता. आफ्रिदी हा एक खेळाडू आहे आणि त्याने खेळभावनेतून सर्वांचा सन्मान करावा, असे टीका या युवा खेळाडूने केली आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये एका सामन्यानंतर अफगाणिस्तानचा २१ वर्षाचा खेळाडू नवीन उल हकला आफ्रीदीने मैदानावर धमकी दिली. एका पाकिस्तानी पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार मैदानात दोघांमध्ये वाद सुरू असताना आफ्रीदी त्याला म्हणाला, "तु जेव्हा जन्माला आला नव्हतात तेव्हापासून मी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करतोय." हा वाद चांगलाच रंगला होता. मैदानाच शाब्दिक राडा सुरु झाला होता. पण यावेळी दोन्ही संघांतील अन्य खेळाडूंनी यामध्ये हस्तक्षेप केला होता आणि हा वाद थांबवला होता. आता नवीनने आफ्रिदीवर चांगलाच पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे. नवीनने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये नवीनने म्हटले आहे की, " मी नेहमीच सर्व खेळाडूंचा सन्मान करत असतो. क्रिकेट हा एक सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, हे मलाही माहिती आहे. पण जेव्हा कोणी म्हणते की, तु आमच्यापेक्षा लहान आहेस तेव्हा तो व्यक्ती फक्त माझ्याबद्दल भाष्य करत नसतो. तर तो व्यक्ती बऱ्याच लोकांना हे सुनावून दाखवत असतो. त्यामुळे सन्मान द्या आणि सन्मान मिळवा, असेच मला वाटते." ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत कॅडी टस्कर्स आणि गॉल ग्लॅडिएटर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत टस्कर्सने २५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ग्लॅडिएटर्सकडून खेळणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीने कॅडी टस्कर्सच्या युवा गोलंदाज नवीन उल हक सोबत वाद घातला. या दोघांच्यात मैदानात वाद सुरू झाला आणि तो मिटवण्यासाठी दोन्ही संघातील अन्य खेळाडूंना यावे लागले. या सामन्यात कॅडी टस्कर्सने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १९६ धावा केल्या. उत्तरादाखल गॉले ग्लॅडिएटर्सला ७ बाद १७१ धावा करता आल्या. या सामन्यात आफ्रीदीला भोपळा फोडता आला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VsTHrP

IND vs AUS: भारताच्या विजयाचा मार्ग झाला सोपा, मुंबईकर शार्दुल ठाकूरने केली भन्नाट कामगिरी

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजयाचा मार्ग थोडासा सोपा झालेला पाहायला मिळत आहे. कारण आजच्या सामन्यात संधी मिळालेला मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने या सामन्यात भन्नाट कामगिरी केली आहे. शार्दुलच्या या कामगिरीमुळे भारताला विजय मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. आज पहिल्यांदाच मुंबईकर शार्दुलला भारताकडून या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्याचबरोबर दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा जो गॅप होता तो आता भारताने स्मिथला बाद करत भरून काढला आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो, असे चाहते म्हणत आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही स्मिथने शतक झळकावत १०४ धावा केल्या होत्या. स्मिथच्या या दोन शतकी खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यांमध्ये ३५०पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारता आला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण तिसऱ्या सामन्यात पराभूत होण्याची नाचक्की भारतीय संघावर येते का, हे तिसऱ्या सामन्यात समजू शकणार आहे. भारताने मालिका गमावली असली तरी हा सामना जिंकून भारत आपली लाज वाचवू शकतो, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत आहे. पण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भारताने हा सामना जर जिंकला तर त्यांचा हा १२ वर्षांतील पहिला विजय असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, आणि यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2I0lcpL

IND vs AUS: तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवल्यास भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज सुरु आहे. भारताने ही मालिका यापूर्वीच गमावलेली आहे. पण या तिसऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे, असे पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत आहे. पण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भारताने हा सामना जर जिंकला तर त्यांचा हा १२ वर्षांतील पहिला विजय असेल. भारताने या मैदानात कोणाबरोबर कसे सामने गमावले आहेत, पाहा... या मैदानात भारताचा पहिला सामना २००८ साली श्रीलंकेबरोबर झाला होता. पावसामुळे हा सामना २९ षटकांचा खेळवण्याचे ठरले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २९ षटकांमध्ये १९५ धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने या सामन्यात सर्वाधिक नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. रोहितच्या या खेळीमुळेच भारताला श्रीलंकेला १९६ धावांचे आव्हान देता आले होते. पण भारताच्या डावानंतर पुन्हा एकदा पाऊस पडला आणि षटके कमी करण्यात आली. अखेर श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २०१६ साली या मैदानात पहिला सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी आरोन फिंचने १०७ धावांची खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनीही शतके झळकावली होती. पण भारताला आव्हानाचा पाठलाग करताना ३२३ धावाच करता आल्या आणि त्यांना २५ धावांनी कपराभव पत्करावा लागला होता. आतापर्यंत भारताच्या झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळ आजच्या सामन्यात जर भारतीय संघ जिंकला तर त्यांचा हा पहिला विजय असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fX0dRb

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांना ही एक गोष्ट करताच आली नाही

कॅनबेरा, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील आज तिसरा वनडे सामना सुरु आहे. पण या तिन्ही सामन्यांत भारताच्या एकाही फलंदाजाला आतापर्यंत ही एक गोष्ट करताच आली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ही एक मोठी तफावत आहे. या एक गोष्ट आतापर्यंत भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली आहे. आतापर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या संघातील एकाही फलंदाजाला अजूनपर्यंत शतक झळकावता आलेले नाही. ऑस्ट्रेलिआविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दिक पंड्याने केल्या होत्या. पहिल्या सामन्यात हार्दिकने ९० धावांची खेळी साकारली होती. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी शतके साकारली होती. या दोन शतकांच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक ८९ धावांची खेळी कर्णधार विराट कोहलीने केली होती. यावेळी त्याचे शतक ११ धावांनी हुकले होते. पण या सामन्यात स्टीव्हन स्मिथने सलग दुसरे शतक लगावले होते आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर या दोन्ही लढतींमध्ये सामनावीराचा पुरस्कार शतक झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथलाच मिळाला होता. आजच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावसंख्या हार्दिक पंड्याने केली. पंड्याने या सामन्यात ७६ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबा ९२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण या सामन्यातही भारताच्या फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. त्यामुळे आता या सामन्यात भारतीय संघ जिंकणार का आणि ऑस्ट्रेलियाकडून कोणता फलंदाज शतक झळकावणार का, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६३ धावांची खेळी साकारली. पण तरीही कोहलीवर तब्बल ११ वर्षांनंतर एक नामुष्की ओढावलेली पाहायला मिळाली आहे. . गेल्या ११ वर्षानंतर पहिल्यांदाच कोहलीला वर्षभरात एकही शतक करता आलेले नाही आणि हा नकोसा विक्रम कोहलीच्या नावावर ११ वर्षांनी झालेला आहे. या वर्षात मात्र कोहलीला एकही शतक झळकावता आले नाही. या वर्षात कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ही ८९ एवढी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HYXVo2

IND vs AUS: हार्दिक-जडेजाने लाज राखली; तिसऱ्या वनडेत भारताच्या ३०२ धावा

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, आणि यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही. वाचा- तिसऱ्या वनडेत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण याचा फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला नाही. या सामन्यात मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव संघात समावेश शिखर धवनने १६ धावांवर बाद झाला. भारताची पहिली विकेट २६ धावांवर गेली. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण गिल ३३ धावा करून माघारी परतला. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेला श्रेयस अय्यर पुन्हा मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल ५ धावांवर माघारी गेला. राहुल बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १२३ अशी होती. वाचा- ... एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना एका बाजूने विराटने संयमी फलंदाजी सुरू ठेवली होती. या सामन्यात त्याने २३वी धाव पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा ३०० डावात १२ हजार धावांचा विक्रम मोडला. विराटने ही कामगिरी २४२ डावात केली. विराट मोठी खेळी करेल असे वाटत असताना जोश हेजलवुडने त्याला ६३ धावांवर बाद केले. या मालिकेत हेजलवुडने त्याला तिसऱ्यांदा बाद केले. विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांनी संघाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. भारताकडून सहाव्या विकेटसाठी झालेली ही तिसऱ्या क्रमांकाची भागिदारी ठरली. हार्दिकने ७६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ९६ तर रविंद्र जडेजाने ५० चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JBqetj

IND vs AUS: तब्बल ११ वर्षांनंतर विराट कोहलीवर ओढावली नामुष्की, पाहायला मिळाली नकोशी कामगिरी

कॅनबेरा, : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६३ धावांची खेळी साकारली. पण तरीही कोहलीवर तब्बल ११ वर्षांनंतर एक नामुष्की ओढावलेली पाहायला मिळाली आहे. कारण एक नकोसा विक्रम आता कोहलीच्या नावावर झालेला आहे. कोहलीने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पहिला वनडे सामना तो २००८ साली खेळला. पण या वर्षात कोहलीला सर्वाधिक ५४ धावाच करता आल्या होत्या. पण त्यानंतर कोहलीने प्रत्येक वर्षी धावांचे डोंगर उभारलेले सर्वांनी पाहिले आहे. पण ११ वर्षांनंतर कोहलीवर पुन्हा एकदा वाईट वेळ आली आहे. गेल्या ११ वर्षानंतर पहिल्यांदाच कोहलीला वर्षभरात एकही शतक करता आलेले नाही आणि हा नकोसा विक्रम कोहलीच्या नावावर ११ वर्षांनी झालेला आहे. कोहलीला २००८ साली एकही शतक झळकावता आले नव्हते. पण २००९ साली कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले होते. या वर्षी कोहलीला एक शतक झळकावता आले होते. त्यानंतर २०१० साली कोहलीने तीन शतके लगावली होती. २०११ साली कोहलीच्या नावावर चार शतके होते. त्यानंतर २०१२ साली कोहलीने पाच शतके लगावली होती. २०१३ आणि २०१४ साली कोहलीने प्रत्येकी चार शतके लगावली होती. त्यानंतर २०१५ हे वर्ष कोहलीसाठी फारसे चांगले गेले नव्हते, कारण यावर्षी कोहलीला फक्त दोनच शतके लगावता आली होती. २०१६ साली कोहलीच्या नावावर तीन शतके होती. त्यानंतर २०१७ आणि २०१८ साली कोहली भन्नाट फॉर्मात होता. या दोन्ही वर्षांत कोहलीने प्रत्येकी सहा शतके लगावली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ साली कोहलीने पाच शतके झळकावली होती. पण या वर्षात मात्र कोहलीला एकही शतक झळकावता आले नाही. या वर्षात कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ही ८९ एवढी आहे. आतापर्यंत कोहलीने जवळपास प्रत्येक वर्षांमध्ये शतके झळकावले होते. पण या गोष्टीला अपवाद २००८ आणि २०२० ही दोन वर्षे ठरली आहेत. कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये शतक झळकावण्याची नामी संधी होती. पण कोहलीला यावेळी शतकासाठी ११ धावा कमी पडल्या. आजच्या तिसऱ्या वनडेमध्येही कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला या सामन्यात ६३ धावा करता आल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33xWWTe

यॉर्कर स्पेशलिस्टचे टीम इंडियाकडून पदार्पण; तिसऱ्या वनडेत धमाका करणार?

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने चार बदल केले. तिसऱ्या वनडेत शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, आणि कुलदीप यादव यांना संधी दिली गेली. यात यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या टी नटराजन याने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाबरोबरच नटराजन याने एक खास विक्रम केला. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून डाव्या हाताने गोलंदाजी करणारा तो ११ खेळाडू ठरला. ९९० वनडे इतिहासात नटराजनच्या आधी घवरी रुद्र प्रताम सिंग, राशिद पटले, जहीर खान, आशिष नेहरा, इरफान पठाण, रुद्र प्रताम सिंह, जयदेव उनाडकट, बरिंदर सरन आणि खलील अहमद यांनी भारताकडून गोलंदाजी केली. वाचा- भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडे कॅप देत त्याचे स्वागत केले. वनडेत खेळणारा तो भारताचा २३२वा खेळाडू ठरला. भारताकडून ऑस्ट्रेलियात करिअरची सुरूवात करणाऱ्या खेळाडूंमध्ये नटराजनचा समावेश झाला आहे. याआधी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, विजय शंकर यांनी पदार्पण केले. २०१६ मध्ये बुमराहने तर २०१९ मध्ये सिराज आणि शंकर यांनी पदार्पण केले होते. वाचा- एन नटराजनने २० प्रथम श्रेणी सामन्यात ६४ विकेट तर १५ लिस्ट ए सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. टी-२० त्याने ३८ लढतीत ३५ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याने १८ विकेट घेतल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HYTmKq

Tuesday, December 1, 2020

सचिनने जे ३०० डावात केले ते विराटने २४२ डावात करून दाखवले

कॅनबेरा: भारताचा कर्णधार याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा केला. विराटने भारताचा मास्टर ब्लास्टर याला मागे टाकले. वाचा- सचिनने वनडे क्रिकेटमध्ये ३०० डावात १२ हजार पूर्ण केल्या होत्या. विराटने ही कामगिरी फक्त २४२ धावात केली आहे. कॅनबेरा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या वनडेत विराटने २३वी धाव करताच त्याने या विक्रमाला गवसणी घातली. वाचा- याआधी विराटने वनडेमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. वाचा- विराटच्या धावांचा वेग १ हजार धावा- २४ डाव २ हजार धावा- ५३ डाव ३ हजार धावा- ७५ डाव ४ हजार धावा- ९३ डाव ५ हजार धावा- ११४ डाव ६ हजार धावा- १३६ डावा (हाशिम अमला १२३ डाव नंतर दुसऱ्या स्थानावर) ७ हजार धावा- (हाशिम अमला १५० डाव नंतर दुसऱ्या स्थानावर) ८ हजार धावा- १७५ डाव (सर्वात वेगाने) ९ हजार धावा- १९४ डाव (सर्वात वेगाने) १० हजार धावा - २०५ डाव (सर्वात वेगाने) ११ हजार धावा- २२२ डाव (सर्वात वेगाने) १२ हजार धावा- २४२ डाव (सर्वात वेगाने) विराटने २५० वनडे सामन्यातील २४१ डावा ५९.२९च्या सरासरीने ११ हजार ९७७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४३ शतक आणि ५९ अर्धशतक आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JuNoBr

विराट कोहलीला सचिनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, हव्यात फक्त २३ धावा

कॅनबेरा: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका गमावली आहे. आज दोन्ही संघात अखेरची लढत होणार असून भारतीय संघासाठी ही प्रतिष्ठेची लढत असेल. पहिल्या सामन्यात ६६ तर दुसऱ्या सामन्यात ५१ धावांनी भारताचा पराभव झाला होता. कॅनबेरा येथे होणाऱ्या तिसऱ्या लढतीत भारतीय संघा समोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून ३-० असा क्लीन स्वीप टाळण्याचे होय. वाचा- तिसऱ्या वनडे भारताचा कर्णधार याला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्लया विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखरेच्या वनडेत जर २३ धावा केल्या तर वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा करणारा विक्रम त्याच्या नावावर होईल. वाचा- विराटने जर २३ धावा केल्या तर २४२ डावात तो १२ हजार धावा पूर्ण करेल. विराटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकता येईल. सचिनने वनडेत १२ हजार धावा करण्यासाठी ३०० डाव खेळले होते. याआधी विराटने वनडेमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. वाचा- विराटच्या धावांचा वेग १ हजार धावा- २४ डाव २ हजार धावा- ५३ डाव ३ हजार धावा- ७५ डाव ४ हजार धावा- ९३ डाव ५ हजार धावा- ११४ डाव ६ हजार धावा- १३६ डावा (हाशिम अमला १२३ डाव नंतर दुसऱ्या स्थानावर) ७ हजार धावा- (हाशिम अमला १५० डाव नंतर दुसऱ्या स्थानावर) ८ हजार धावा- १७५ डाव (सर्वात वेगाने) ९ हजार धावा- १९४ डाव (सर्वात वेगाने) १० हजार धावा - २०५ डाव (सर्वात वेगाने) ११ हजार धावा- २२२ डाव (सर्वात वेगाने) वाचा- विराटने २५० वनडे सामन्यातील २४१ डावा ५९.२९च्या सरासरीने ११ हजार ९७७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ४३ शतक आणि ५९ अर्धशतक आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fYAIyQ

India vs Australia 3rd ODI Latest Update: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

कॅनबेरा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे आज होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने भारतासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या दोन्ही लढतीत भारतीय गोलंदाजांनी खराब कागमिरी केली. त्यामुळे सामन्यात संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वनडेत विजय मिळून भारतीय संघ पुढील लढतींसाठी लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Live अपडेट () >> ऑस्ट्रेलिया संघात तीन बदल >> भारतीय संघातील बदल- मयांक अग्रवाल,मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव संघात समावेश >> : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार >> यजमान ऑस्ट्रेलियाची ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lrMKSn

करोनानंतर भारतामध्ये होणार 'ही' पहिली स्पर्धा, बीसीसीआयने जाहीर केल्या तारखा...

मुंबई : करोनानंतर भारतामध्ये नेमकी कोणती पहिली स्पर्धा होणार, हे बीसीसीआयने आता निश्चित केले आहे. डिसेंबर महिन्यापासूनच या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कारण बीसीसीआयने या स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्याचेही समोर येत आहे. करोनामुळे आयपीएलही भारतामध्ये खेळवण्यात आली नव्हती, युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये करोनामुळेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही रद्द केली होती. पण आता बीसीसीआयने भारतामध्ये स्पर्धा भरवण्याचे निश्चित केल्याचे समजते आहे. त्यामुळेच भारतामध्ये होणाऱ्या आयपीएलच्या लिलावापूर्वी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारतामध्ये २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीमध्ये मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेचे आयोजन बीसीसीआय करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (मंगळवार) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर, एन. श्रीनिवासन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यामध्ये स्थानिक क्रिकेटबाबत एक चर्चा झाली. स्थानिक क्रिकेटला सुरुवात करण्यासाठी काही जणांनी आपली मते व्यक्त केली होती, त्याचबरोबर काही सल्लेही देण्यात आले होते. त्यानंतर करोनानंतर भारतामध्ये मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा पहिल्यांदा आयोजित करण्यात येईल, याबाबतचा निर्णय झाल्याचे समजते आहे. जानेवारी महिन्यामध्ये आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी स्थानिक क्रिकेटमधील गुणवान खेळाडूंना हेरण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे समजते आहे. या स्पर्धेच्या आयोजनानंतरच रणजी करंडक आणि विजय हजारे करंडक या स्पर्धा कधी खेळवायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटबाबत राज्य संघटनांकडून काही सल्ले मागितले होते. ज्यामध्ये सर्वाधिक राज्य संघटनांनी ट्वेन्टी-२० क्रिकेटने सुरुवात करायला हवी, असे सल्ले दिले होते. त्याचबरोबर काही राज्य संघटनांनी रणजी करंडक स्पर्धेलाही प्राधान्य दिले होते. त्याचबरोबर हरियाणाच्या क्रिकेट मंडळाने स्थानिक क्रिकेट सुरु न करण्याचा सल्ला दिला होता. पण हिमाचल क्रिकेट मंडळाने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेने सुरुवात करावी, असे म्हटले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qiNSM4

भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करून युएईमध्ये खेळवा, पाकिस्तानने तोडले अकलेचे तारे

कराची : भारतामध्ये पुढच्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. पण या विश्वचषकाच्या आयोजनाला पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने (पीसीबी) विरोध केला आहे. हा विश्वचषक भारतामध्ये न खेळवता ते युएईमध्ये खेळवावा, अशी मागणी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे डोके ठिकाणावर आहे ना, अशी प्रतिक्रीया भारतीय चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करावा लागला होता. त्याचबरोबर भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे. हा विश्वचषक भारतामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये खेळवण्यात आला होता. पण या स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरी पूर्ण झाल्या नसल्यामुळे हा विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. पण त्यानंतर आता हा विश्वचषक भारतामधून रद्द करावा, असा कांगावा करायला पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने सुरुवात करत अकलेचे तारे तोडले आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी भारतामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाला विरोध केला आहे. भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले तर पाकिस्तानच्या संघाला काही समस्या जाणवतील, असा त्यांच्या बोलण्याचा रोख आहे. त्यामुळेत भारतातील हा विश्वचषर युएईमध्ये खेळवण्यात यावा, अशी मागणी खान यांनी केली आहे. वसिम खान यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, " सध्याच्या घडीला करोनाचे वातावरण जगभरात आहे. भारतामध्येही करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन यशस्वीपणे होऊ शकेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे भारतात विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येऊ नये, त्यापेक्षा या विश्वचषकाचे आयोजन हे युएईमध्ये करण्यात यावे." करोनानंतर भारताने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला नकार दिला होता. त्याचबरोबर आयपीएल युएईमध्ये झाली असली तरी त्यामध्ये एकाही पाकिस्तानच्या खेळाडूला प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्ता़नचे क्रिकेट मंडळ आपला राग अशापद्धतीने व्यक्त करत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आयसीसीकडे विश्वचषकासाठीचा व्हिसा मिळवताना आम्हाला समस्या येणार नाही, असे आश्वासन मागितले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qjFYlh

धक्कादायक... पाकिस्तानच्या संघातील दहा जणांना झाला करोना, न्यूझीलंडमध्ये उडाली एकच खळबळ

ऑकलंड: करोनाला पळवणारा पहिला देश म्हणून न्यूझीलंडचे नाव घेतले जायचे. पण आता न्यूझीलंडमध्येच करोना दाखल झाला आहे. कारण न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेला पाकिस्तानच्या जवळपास संपूर्ण संघच करोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाला आहे. त्याचबरोबर एका खेळाडूच्या करोना चाचणीचा अहवाल अजून येणार आहे. या सर्व गोष्टीमुळे न्यूझीलंडमध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दौरा होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंची दुसरी करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर एकूण पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या चाचणीत सात खेळाडू करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले होते. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या करोना चाचणीमध्ये आता तीन अन्य पाकिस्तानच्या खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एका खेळाडू करोनाच्या चाचणीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही. पाकिस्तानचा संघ आपल्या सपोर्ट स्टाफबरोबर २४ नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी पहिल्यांचा त्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी जेव्हा ही पहिली चाचणी झाली होती. तेव्हा पाकिस्तानच्या संघातील सात सदस्यांना करोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सातही सदस्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाची दुसरी करोना चाचणी झाली आणि त्यामध्ये तीन जणांना करोना असल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा करोनाची तिसरी चाचणी रविवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघातील नेमक्या किती सदस्यांना करोना झाला आहे, याची पूर्ण माहिती रविवारी सर्वांना समजू शकणार आहे. पाकिस्तानच्या संघातील १० सदस्यांना करोना झाला आहे. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या संघातील अन्य सदस्यांनी सराव करायचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वैद्यकीय कर्मचारी सराव करण्यापासून रोखत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानचा संघ सराव करत राहणार आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंमुळे न्यूझीलंडमधील करोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचे आता पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37nGu9w

IND VS AUS: तिसऱ्या वनडेपूर्वी भारताच्या गोलंदाजाला गंभीर दुखापत, दौरा सोडून मायदेशात दाखल

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारताच्या एका गोलंदाजाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला पुन्हा भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता दौरा सोडून हा वेगवान गोलंदाज भारतात परतला आहे. भारतीय संघाबरोबर वेगवान गोलंदाज इशान पोरेल हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. पण सराव करताना इशानच्या पायाचे स्नायू दुखावले गेले आहेत. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इशान हा भारताच्या संघाबरोबर सराव करत होता, त्यावेळी त्याला ही दुखापत झाली. इशानला भारतीय खेळाडूंना सराव देण्यासाठीच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेण्यात आले होते. बीसीसीआयच्या सूत्रांनी यावेळी सांगितले की, " इशानला भारतीय संघाबरोबर सराव करताना दुखारत झाली होती. त्यामुळे इशानला भारतात बोलण्यात आले आहे. आता इशान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेल्यावर त्याच्या दुखापतीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तिथेच त्याच्या फिटनेसवर लक्ष देण्यात येईल." भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजीचा चांगलाच सराव करता यावा, यासाठी इशान, कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी आणि टी. नटराजन यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कमलेश नागरकोटीने आपले नाव परत घेतले होते. त्यानंतर टी. नटराजनला नवदीप सैनीचा पर्यायी गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. आता इशान दुखापतग्रस्त झाला असून तो भारतामध्ये परतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सराव देण्यासाठी कार्तिक त्यागी हा एकमेव गोलंदाज सध्या भारतीय संघात आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाताना इशानने आपला एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये इशानसह भारताचा यष्टीरश्रक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Vn9aK5

IND VS AUS: मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

कॅनबेरा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विकम मोडण्याची सुवर्ण संधी असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शमीने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. तिसऱ्या वनडेमध्ये जर शमीने चांगली गोलंदाजी केली तर त्याच्याकडे १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी नक्कीच असेल. कारण १८ वर्षांपूर्वीच एक विक्रम आता शमीला खुणावत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना हा उद्या कॅनबेरा येथे होणार आहे. या सामन्यात जर शमीने अचूक मारा करत दोन विकेट्स मिळवल्या तर त्याला १८ वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडता येणार आहे. तिसऱ्या सामन्यात शमीने दोन विकेट्स मिळवले तर सर्वात जलद भारतासाठी १५० बळी मिळवणारा तो गोलंदाज ठरू शकतो. शमी यावेळी १८ वर्षांपूर्वीचा कोणाचा विक्रम मोडू शकतो, पाहा.... आतापर्यंत शमीच्या नावावर ७९ एकदिवसीय सामने आहेत. या ७९ वनडे सामन्यांमध्ये शमीने १४८ बळी मिळवले आहेत. यापूर्वी भारताकडून सर्वात जलद १५० बळी मिळवण्याचा विक्रम हा अजित आगरकरच्या नावावर होता. आगरकरने ९७ एकदिवसीय सामन्यांमध्ये आपले १५० बळी पूर्ण केले होते. त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये सर्वात जलद १५० बळी मिळवण्याचा मान शमीला मिळू शकतो. पण त्यासाठी त्याने या सामन्यात दोन बळी मिळवणे गरजेचे असेल. शमीने जर या वनडे सामन्यात १५० बळी मिळवले तर तो सर्वात जलद एवढे बळी मिळवण्याच्या यादीत तिसऱ्य क्रमांकावर पोहोचू शकतो. कारण सर्वात जलद १५० बळी पूर्ण करण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. कारण स्टार्कने ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० बळी पूर्ण केले होते. त्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू साकलेन मुश्ताकने १५० वनडे सामन्यांमध्ये १५० बळी मिळवले होते. त्यानंतर या यादीमध्ये शमीचा तिसरा क्रमांक लागू शकतो. पण त्यासाठी शमीने तिसऱ्या वनडेमध्ये दोन विकेट्स मिळवणे महत्वाचे असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lpHiQ3

IND VS AUS: तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहली टॉस हरला, तर भारताचा पराभव जवळपास निश्चित

कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना उद्या कॅनबेरा येथे रंगणार आहे. भारतीय संघाला आपली लाच वाचवण्यासाठी ही अखेरची संधी असेल. पण या तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली जर टॉस हरला तर भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित समजला जात आहे. सिडनीतील दोन्ही वनडे सामने भारताने गमावले आहेत. पण तिसरा वनडे सामना हा कॅनबेरा येथील मानुका ओव्हल या मैदानावर होणार आहे. या मैदानात नाणेफेकीचा कौल महत्वाचा समजला जातो. कारण गेल्या सात सामन्यांमध्ये ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे, त्यांनाच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या मैदानात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्यासाठीच प्राधान्य देत असतो. त्यामुळे उद्याच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने नाणेफेक गमावली आणि ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर गेल्या सात सामन्यांतील निकालानुसार भारताला पराभव पत्करावा लागू शकतो. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौलही महत्वाचा असेल. आतापर्यंत झालेल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती आणि दोन्ही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला, हे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर भारताला विजय मिळवायचा असेल तर त्यांनी प्रथम फलंदाजी करायला हवी. त्यासाठी नाणेफेकीचा कौल हा सर्वात महत्वाचा ठरणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर या मैदानातील विक्रमानुसार भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसू शकतो. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो आणि कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये कोहली आतापर्यंत एकदाही टॉस जिंकू शकलेला नाही. नाणेफेकीचा कौल कोहलीच्या बाजूने न लागल्यामुळेच भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत दुसऱ्यांना फलंदाजी करावी लागली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. पण ही गोष्ट जर तिसऱ्या सामन्यात बदलली तर नक्कीच काही तरी फरक पडू शकतो आणि भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो, असे चाहत्यांना वाटत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fT0UuE

IND VS AUS: 'भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या स्टीव्हन स्मिथला लवकर आऊट करायचंय, तर हे कराचं'

सिडनी, : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ हा सध्याच्या घडीला भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण भारताविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये स्मिथने दोन शतकं लगावली आहेत आणि सामनावीरही तोच ठरला आहे. त्यामुळे जर स्मिथ लवकर बाद झाला तर भारतीय संघाला विजय मिळवता येऊ शकतो. यासाठीच भारताच्या एका खेळाडूने स्मिथला लवकर बाद करण्याची एक युक्ती सांगितलेली आहे. ही गोष्ट केली तर स्मिथ झटपट तंबूत परतू शकतो, असे या खेळाडूचे म्हणणे आहे. स्मिथला जर लवकर बाद करायचे असेल, तर तो ज्यावेळी फलंदाजीला येईल त्यावेळी वेगवान गोलंदाजांना संधी देऊ नये. स्मिथ फलंदाजीला आल्यावर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांना गोलंदाजीला आणायला हवे. कारण आतापर्यंत स्मिथ हा फिरकी गोलंदाजीवर सुरुवातीला मोठे फटके खेळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. वेगवान गोलंदाजीवर तो चांगली फटकेबाजी करतो आणि एकदा स्थिरस्थावर झाल्यावर त्याला कोणीही लवकर आऊट करू शकत नाही. त्यामुळे स्मिथला जर स्थिरस्थावर व्हायला द्यायचे नसेल तर तो फलंदाजीला आल्यावर फिरकीपटूंना गोलंदाजी करायला द्यायला हवी. जर भारताने असे केले तर नक्कीच स्मिथ लवकर बाद होईल. त्यामुळे स्मिथला लवकर बाद करण्यासाठी भारताने ही गोष्ट करायलाच हवी, असा विश्वास भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही स्मिथने शतक झळकावत १०४ धावा केल्या होत्या. स्मिथच्या या दोन शतकी खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यांमध्ये ३५०पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारता आला. त्यामुळे जर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर स्मिथ लवकर बाद झाला तर ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण तिसऱ्या सामन्यात पराभूत होण्याची नाचक्की भारतीय संघावर येते का, हे तिसऱ्या सामन्यात समजू शकणार आहे. भारताने मालिका गमावली असली तरी हा सामना जिंकून भारत आपली लाज वाचवू शकतो, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामन्यात भारत विजय मिळवणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JsrUp0

शाहरूख खानने विकत घेतला क्रिकेटमधील तिसरा टी-२० संघ; नाव आहे...

नवी दिल्ली: बॉलिवूड स्टार शाहरूख खानने भारतातील आयपीएल () आणि कॅरेबियन प्रीमियर लीग () मध्ये संघ विकत घेतल्यानंतर आता त्याने अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. शाहरूखने अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये नवा संघ विकत घेतला आहे. शाहरूखकडे आयपीएलमधील कोलकाता आणि सीपीएलमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स असे दोन संघ आहेत. आता त्याने लॉस एजलिस हा संघ विकत घेतला आहे. वाचा- शाहरूखच्या या नव्या संघाचे नाव लॉस एजलिस नाइट रायडर्स असे ठेवण्यात आले आहे. भारतातील आयपीएल प्रमाणेच अमेरिकेत टी-२० लीग स्पर्धा होणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या लीगमध्ये सहा संघ असणार आहेत. यात सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, डलास, न्यूयॉर्क आणि लॉस एजलिस हे संघ असतील. अमेरिकन क्रिकेट एटरप्रायझेसचे सहसंस्थापक विजय श्रीनिवासन यांनी सांगितली की, यामुळे अमेरिकेतील क्रिकेट वाढण्यास मदत मिळेल. वाचा- नाइट रायडर्स फ्रेंचाइझीचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी सांगितले की, अमेरिकेतील मार्केट हे जगातील सर्वात मोठे मार्केट आहे. अमेरिकेतील ही क्रिकेट लीग मल्टी मिलियन डॉलर टी-२० स्पर्धा असेल. ही स्पर्धा २०२१च्या जुलै महिन्यात सुरू होईल. या स्पर्धेचा कालावधी ९ आठवडे असेल. अधिकतर सामने आठवड्याच्या अखेरीस होतील. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33uUvBa

IND VS AUS: जसप्रीत बुमराने रागाच्या भरात केले नकोसे काम, पाहा नेमकं काय घडलं...

सिडनी, : भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्याच्या घडीला वाईट फॉर्ममध्ये आहे. कारण गेल्या दोन एकदिवसीय मालिकांमध्ये त्याच्या नावावर फक्त दोनच विकेट्स आहे. त्याचबरोबर गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने १५२ धावा दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या कामगिरीवर बुमरा नक्कीच निराश असेल. पण यावेळी रागाच्या भरात बुमराने एक नकोसे काम केलेले पाहायला मिळाले आहे. बुमराचे अपयश हेदेखील भारताच्या पराभवाचे एक महत्वाचे कारण आहे. कारण गेल्या सहा सामन्यांमध्ये त्याला दोनच बळी मिळवता आल्या आहेत. या सर्व दडपणाखाली असताना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बुमराकडून एक नकोशी गोष्ट पाहायला मिळाली. बुमराला या सामन्यात आपल्या रागावर नियंत्रण मिळता आले नाही. त्याचमुळे मैदानात फिल्डींग मार्करला त्याने लाथ मारल्याचे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले. बुमराने आपल्या वाईट गोलंदाजीचा राग मैदानात अशाप्रकारे काढल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर एका चाहत्याने हा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर हा बुमराचा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बुमरा हा शांत स्वभावाचा गोलंदाज असल्याचे आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिले आहे. पण सध्याच्या बुमरा हा आपल्या कामगिरीवर निराश आहे. ऑस्ट्रेलियातील दोन एकदिवीसीय सामन्यांमध्ये बुमराकडून अचूक गोलंदाजी पाहायला मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बुमराच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हीच गोष्ट कुठेतरी बुमराला सतावत असेल. त्यामुळे बुमराकडून मैदानात ही नकोशी गोष्ट पाहायला मिळाली होती. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बुमराला एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्यानंतर आता दोन सामन्यांमध्ये फक्त दोनच विकेट्स बुमराच्या नावावर आहेत. त्यामुळे या मालिकेत झालेल्या भारतीय पराभवाचे एक कारण बुमराची वाईट गोलंदाजी असल्याचेही म्हटले जात आहे. आयपीएलनंतर बुमराकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली नाही. पण आता ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेत बुमरा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36qck68

टी-२० मध्ये या खेळाडूने इतिहास घडवला; धोनी आणि विराटचा विक्रम मागे टाकला

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने चार विकेटनी विजय मिळवला आणि मालिका २-० अशी जिंकली. प्रथम फलंदाज करत दक्षिण आफ्रिकेने १४७ धावा केल्या होत्या. इंग्लंडने १९.५ षटकात हे लक्ष्य पार केले. वाचा- इंग्लंडकडून मलानने ४० चेंडूत ७ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या. तर कर्णधार () २६ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मॉर्गनने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इंग्लंडने सलग चौथा टी-२० विजय मिळवला आहे. जगातील कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नाही. त्याच बरोबर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली टी-२० मध्ये इंग्लंडने आफ्रिकेवर सहाव्यांदा विजय मिळवला. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा तो कर्णधार झाला आहे. वाचा- याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. त्याने आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यात विजय मिळवला होता. त्याच बरोबर मॉर्गनने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम देखील मागे टाकला. दुसऱ्या टी-२० लढतीत मॉर्गन २६ धावांवर नाबाद राहिला. वाचा- धावांचा पाठलाग करताना सहा वेळा नाबाद राहिला होता. मॉर्गनने ही कामगिरी सात वेळा केली. या यादीत सर्वात अव्वल स्थानी महेंद्र सिंह आहे. धोनीने टी-२०मध्ये १२ वेळा अशी कामगिरी केली आहे. वाचा- टी-२० लढतीमधील अखेरची आणि अंतिम लढत आज होणार असून भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता ही मॅच सुरू होईल. इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतल्याने आफ्रिकेसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o7iIoI

विराट बाद झाला की माझा मुलगा मॅच बघत नाही; इंग्लंडचा माजी कर्णधार

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमधील सध्याचा आघाडीचा फलंदाज असलेल्या विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही. जगभरातील क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये विराट प्रसिद्ध आहे. विराटची फलंदाजी ही लोकांना टिव्ही समोर बसवते. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या विराटने आतापर्यंत वनडेत ४३ तर कसोटीत २७ अशी ७० शतक केली आहेत. वाचा- भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या विराट सारखा फलंदाज होण्याचे स्वप्न अनेकांचे आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याचा मुलगा विराटचा मोठा चाहता आहे. भारताचा सामना असताना तो नेहमी विराट फलंदाजीला आला की मला उठवा असे सांगतो. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत बाद झाल्यानंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. लहान मुलांमध्ये विराट खुप लोकप्रिय आहे. तो एक स्पेशल खेळाडू आहे, असे वॉन म्हणाला. दुसऱ्या वनडेत विराटने ८९ धावा केल्या. या सामन्यात भारत ३९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होते. विराट शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण शॉट मिडविकेटवर एक शानदार कॅचवर तो बाद झाला. या वर्षी विराटने ८ वनडे सामन्यात ४ अर्धशतक झळकावली आहेत. त्याला अद्याप एकही शतक करता आले नाही. वाचा- विराटला शतक करता आले नाही म्हणून भारतीय चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एक शतक झळकावल्यानंतर तो ३-४ शतक सहज करेल, असे वॉनने सांगितले. वाचा- याबाबत काळजी... विराटची फलंदाजी हा काळजीचा विषय नाही. मला काळजी वाटते ती त्या ३ कसोटी सामन्यांची ज्यात विराट कोहली खेळणार नाही. विराट कोहली शिवाय भारतीय संघाला विजय मिळवता येईल असे वाटत नाही. कसोटी संघात तो गरजेचा आहे, असे वॉन म्हणाला. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lsNIhc

तिसरी वनडे: ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला मिळणार संधी

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात काही बदलासह उतरण्याची शक्यता आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन लढती गमावल्या असल्याने ही लढत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी असेल. बुधवारी दोन डिसेंबर रोजी कॅनबरा येथे होणाऱ्या लढतीत भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत. वाचा- मालिकेतील पहिल्या दोन लढतीत भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली होती. त्यामुळे या अखेरच्या लढतीत विराट कोहली गोलंदाजीत काही बदल करू शकतो. हा बदल गोलंदाजी मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ३७४ तर दुसऱ्या वनडेत ३८९ धावा केल्या होत्या. आता अखेरच्या लढतीत विराट कोहली फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. वाचा- भारतासाठी तिसरी आणि अखेरची लढत ही प्रतिष्ठेची आहे. असा असू शकतो भारताचा संघ... धवन-मयांक सलामीवीर भारतीय डावाची सुरूवात पुन्हा एकदा अनुभवी शिखर धवन आणि मयांक अग्रवाल हेच करतील. पहिल्या दोन्ही लढतीत अर्धशतकी भागिदारी करणाऱ्या या जोडीकडून यावेळी मोठी भागिदारी होण्याची अपेक्षा आहे. वाचा- अशी असेल मधली फळी मधल्या फळीत पुन्हा एकदा विराट कोहलीकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. श्रेयस अय्यर पहिल्या दोन लढतीत अपयशी ठरला होता. केएल राहुल चांगल्या लयमध्ये दिसत आहे. पण दोन्ही सामन्यात विजय मिळून देण्यात अपयशी ठरला होता. या तीनपैकी एका फलंदाजाला सामना अखेरपर्यंत घेऊन जावा लागेल. अष्ठपैलू जडेजा आणि हार्दिक हार्दिक पांड्याने गेल्या सामन्यात गोलंदाजी केली होती. अखेरच्या लढतीत देखील तो गोलंदाजी करू शकतो. रविंद्र जडेजा देखील गोलदाजी आणि फलंदाजीत योगदान देऊ शकतो. वाचा- फिरकीपटूचा हा पर्याय कुलदीप यादवला तिसऱ्या वनडेत संधी मिळू शकते. युजवेंद्र चहल सोबत तो चांगली कामगिरी करू शकतो. बुमराह आणि शमी पहिल्या दोन लढतीत नवदीप सैनीला अखेरच्या लढतीत वगळले जाऊ शकते. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हेच जलद गोलंदाजाची मुख्य बाजू सांभाळतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VooZjL

IND VS AUS: विराट कोहलीवर दिल्लीकर आशीष नेहराची जोरदार टीका, म्हणाला...

सिडनी, : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर आता दिल्लीकर आशीष नेगरानेच जोरदार टीका केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील वनडे मालिका गमावली आहे. या मालिकेत कोहलीला गोलंदाजांना व्यवस्थित हाताळता आले नाही, अशी टीका नेहराने यावेळी केली आहे. नेहरा म्हणाला की, " कोहली हा निर्णय घेताना भरपूर घाई करतो. गोलंदाजीमध्ये कोहली हा फार लवकर बदल करतो, त्यामुळेच त्याला जास्त यश मिळत नाही. दुसऱ्या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून दोन षटके टाकून घेतली. त्यानंतर त्याने नवदीप सैनीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. पण मला वाटते की, शमीला दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करायला द्यायला हवी होती. पण त्यानंतर कोहलीने जसप्रीत बुमराला दोन षटके टाकायला दिली. या गोष्टीमध्ये कोहलीने बदल करायला हवा, असे मल वाटते." नेहरा पुढे म्हणाला की, " गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथला हार्दिक पंड्याने बाद केले. पण कोहलीने त्याला चार षटकेच गोलंदाजी दिली. त्यानंतर त्याने मयांक अगरवालकडून गोलंदाजी करून घेतली. हा कोहलीने मैदानात घेतलेला निर्णय असावा. कारण जर मुख्य गोलंदाज चांगली कामगिरी करत असले असते तर कोहलीला ही गोष्ट करावी लागली नसती. पण भारताच्या मुख्य गोलंदाजांना विराट अजून चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. त्याने मुख्य गोलंदाजांना हाताळताना जास्त घाई करता कामा नये, असे मला तरी वाटते." कोहली हा फलंदाजी करतानाही जास्त घाई करताना दिसतो, असेही नेहराचे म्हणणे आहे. याबाबत नेहरा म्हणाला की, " पहिल्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा कोहलीचा झेल सुटला तेव्हा तो फलंदाजी करताना जास्त घाई करत आहे, असे वाटले. कारण आतापर्यंत कोहलीने बऱ्याचदा ३५० धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी केली आहे. त्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्यावेळी मला असे वाटले की, चकोहली ३५० नाही तर ४७५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36nKg39

'तुझा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी शतक करतोय'; मैदानात राडा, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली: भारत विरोधी वक्तव्य करून प्रसिद्धीला येणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ( ) ने आता मैदानावर राडा केला आहे. सध्या () स्पर्धेत खेळणाऱ्या आफ्रिदीने एका २१ वर्षाच्या युवा खेळाडूसोबत वाद घातला. वाचा- LPL मध्ये ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत कॅडी टस्कर्स आणि गॉल ग्लॅडिएटर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत टस्कर्सने २५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ग्लॅडिएटर्सकडून खेळणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीने कॅडी टस्कर्सच्या युवा गोलंदाज सोबत वाद घातला. या दोघांच्यात मैदानात वाद सुरू झाला आणि तो मिटवण्यासाठी दोन्ही संघातील अन्य खेळाडूंना यावे लागले. वाचा- अफगाणिस्तानचा २१ वर्षाचा खेळाडू नवीनला आफ्रीदीने मैदानावर धमकी दिली. एका पाकिस्तानी पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार मैदानात दोघांमध्ये वाद सुरू असताना आफ्रीदी त्याला म्हणाला, तु जेव्हा जन्माला आला नव्हतात तेव्हापासून मी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करतोय. वाचा- करू या सामन्यात कॅडी टस्कर्सने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १९६ धावा केल्या. उत्तरादाखल गॉले ग्लॅडिएटर्सला ७ बाद १७१ धावा करता आल्या. या सामन्यात आफ्रीदीला भोपळा फोडता आला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36lTKMu

क्रिकेट ऑस्ट्रेलिया BCCIच्या पुढे शेपूट घालते; बोर्डाविरुद्धचा वाद न्यायालयात पोहोचला

मेलबर्न: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. कोरना लॉकडाउनंतर ऑस्ट्रेलियात प्रथमच आंतरारष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. अशातच एक वादाला सुरुवात झाली आहे. वाचा- आणि यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आता संबंधित चॅनलने दोन्ही क्रिकेट बोर्डातील काय संवाद झाला याची माहिती मागत न्यायालयात धाव घेतली आहे. इतक नव्हे तर चॅनल सेव्हनने सीए म्हणजेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला घाबरते असे म्हटले आहे. वाचा- सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार चॅनल सेव्हनने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेल्याचे म्हटले आहे. चॅनलने केलेल्या दाव्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआच्या हिताचा विचार करून भारताच्या दौऱ्यात बदल करून प्रसारण कराराचे उल्लंघन केले आहे. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्याची सुरूवात वनडे आणि टी-२० मालिके ऐवजी डे-नाइट कसोटीने करायची होती. जी सध्याच्या कार्यक्रमानुसार १७ डिसेंबर रोजी एडिलेडमध्ये खेळवली जाणार आहे, असे सेव्हन वेस्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वॉरबर्टन म्हणाले. ही गोष्टी लाजिरवाणी आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे प्रसारणकर्ते म्हणून आमचा सन्मान करत नाही आणि बीसीसीआयच्या पुढे शेपूट घालते ते बीसीसीआयशी घाबरतात, असे ही वॉरबर्टन म्हणाले. वाचा- सीएचे अधिकारी, आणि अन्य प्रसारणकर्ता फॉक्सवेल आपल्या मर्जीनुसार कारभार करत आहेत. भारताच्या दौऱ्याला अंतिम रुप देण्याच्या संदर्भात सीए, बीसीसीआय, फॉक्स्टेल आणि राज्य सरकारांचे अधिकारी यांच्यात झालेले ई-मेल संवाद चॅनल सेव्हनला पाहायचे आहेत. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ociQ6I

खेळाडू टी-२० क्रिकेटमधून बाहेर आले नाही; भारत ३१ वर्षातील मोठ्या पराभवाच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची लढत २ डिसेंबर रोजी कॅनबरा येथे होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन लढतीत विजय मिळवून मालिकेत विजय आघाडी मिळवली आहे. आता तिसऱ्या लढतीत विजय मिळवून भारताला क्लीन स्वीप देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. जर असे झाले तर भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला जाईल. टीम इंडियाचा ३१ वर्षानंतर प्रथम सहा वनडे सामन्यात पराभव होईल. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने याआधी सलग सहा वनडेत पराभव स्विकारून ३१ वर्ष झाली. ७ मार्च १९८९ ते १५ ऑक्टोबर १९८९ या काळात भारताचा सहा वनडे सामन्यात पराभव झाला होता. तेव्हा वेस्ट इंडिज सहा वनडे सामन्याच्या मालिकेत भारताचा क्लीन स्वीप केला होता. त्यानंतर सातव्या लढतीत शारजामध्ये भारताचा पाकिस्तानने पराभव केला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिलीप वेंगसरकर कर्णधार होते. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कृष्णामचारी श्रीकांत हे नेतृत्व करत होते. पण त्याननंतर कधीच सलग सहा सामन्यात भारताचा पराभव झाला नाही. वाचा- सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सलग दोन वनडेत पराभव झाल्याने भारतीय संघाचा पाच सामन्यात पराभव झालाय. याआधी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला होता. तेव्हा भारताने मालिका ३-०ने गमावली होती. नियमीत गोलंदाजांना बॅकअप म्हणून पर्यायी गोलंदाज नसल्यामुळे आणि फलंदाजीत अपेक्षित कामगिरी न केल्याने भारताला पराभव स्विकारावा लागला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन पराभवामुळे ही गोष्टी स्पष्ट झाली आहे की, भारताच्या खेळाडूंनी सलग दोन महिने टी-२० खेळल्यामुळे आता ५० षटकाच्या क्रिकेट सामन्यात स्वत:ला फिट बसताना त्यांना अडचणी येत आहेत. ही गोष्ट स्वत: कर्णधार विराट कोहलीने देखील मान्य केली आहे. आम्ही टी-२० खेळत होतो. ज्याचा परिणाम वनडे सामन्यात होत असेल. २५ षटकानंतर आम्ही शैली खराब होत असल्याचे विराट म्हणाला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mCMtgM

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...