Ads

Saturday, June 5, 2021

मोठी बातमी... ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीने या देशाशी साधला संपर्क, बीसीसीआयची चिंता वाढली

नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. पण आता विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या एका देशाशी विश्वचषकाच्या आयोजनासाठी संपर्क साधल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का असू शकतो. भारतामध्ये सध्याच्या घडीला करोनाचे भीषण वातावरण आहे आणि या वातावरणात ट्वेन्टी-२० विश्वचषक होऊ शकतो, असे दिसत नाही. त्यामुळे आयीसीसीने आता ओमान या देशाशी संपर्क साधला आहे. ओमानची राजधानी असलेल्या मस्कतमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे काही सामने होऊ शकतात, असे आता पुढे येत आहे. ओमान क्रिकेट संघटनेचे सचिन मधु जेसरानी यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आमच्याबरोबर संपर्क साधला आहे. त्याचबरोबर आमच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष पंकज खिमजी हे बीसीसीआयबरोबर चर्चा करत आहे. ही चर्चा सकारात्मकपणे होत आहे." मधु जेसरानी यांनी पुढे सांगितले की, आयसीसीने आमच्याकडे काही गोष्टींची माहिती मागवली आहे. जर विश्वचषकाच्या सामन्यांचे आयोजन करायचे असेल तर तुमच्याकडे कोणत्या सुविधा आहेत, याची मागणी आयसीसीने केली आहे. आम्ही आयसीसीला याबाबत सर्व माहिती दिली आहे. आमच्याकडे किती मैदानं आहेत आणि त्यामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात, याबाबतची माहिती आम्ही आयसीसीला पुरवली आहे." ट्वेन्टी-२० विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १६ देशांपैकी एक ओमान आहे. ओमानमधील क्रिकेट हे खिमजी रामदास चालवत आहे, जे एक भारतीयच आहेत. मधु जेसरानी यांनी पुढे सांगितले की, " आमच्याकडील दोन्ही मैदानं ही मस्कतमध्येच आहेत. यापैकी अल अमरत स्टेडियमध्ये फ्लडलाइट्स आहेत, जेणेकरुन दिवस-रात्र सामने होऊ शकतात. हे मैदान विमानतळापासून १५-२० किलोमीटर अंतरावर आहे. हे मैदान २०१२ साली बनवण्यात आले होते. त्याचबरोबर या मैदानात आयसीसीचे काही सामनेही खेळवण्यात आलेले आहेत." आयसीसीने यापूर्वी भारताबरोबर संपर्क साधलेला होता आणि त्यांनी भारताला जूनपर्यंतची मुदतही दिली आहे. पण त्यानंतर आयसीसीने आता ओमानशी संपर्क साधला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fTUj52

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...