दुबई: म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची काल १ जून रोजी ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. तसेच पुढील आठ वर्षातील फ्यूचर टूर्स कार्यक्रम (FTP) देखील ठरवण्यात आला. यामध्ये प्रत्येक दोन वर्षानंतर आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. तर ५० ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये २०२७ पासून १४ संघ असतील. वाचा- मंगळवारी झालेल्या या बैठकीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चार सत्रात दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याचा निर्णय आयसीसीने जाहीर केला. आयसीसी बोर्डने २०२४ ते २०३१ या काळातील कार्यक्रम जाहीर केलाय. यात आणि टी-२० वर्ल्डकप खेळवले जातील आणि त्याच बरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुन्हा केले जाणार आहे. आयसीसीच्या महिला स्पर्धांचा कार्यक्रम याआधीच निश्चित करण्यात आला आहे. वाचा- या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकमध्ये १६ संघ असणार आहेत. सध्या वनडे वर्ल्डकपमध्ये १० संघांचा समावेश आहे. तर २०२७ पासून १४ संघ असतली. हे संघ प्रत्येकी सात अशा दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील ३ संघ सुपर सिक्समध्ये पोहोचतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल लढती होतील. २००३च्या वर्ल्डकपचे देखील हेच स्वरुप होते. वाचा- टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी पाच संघांचे पाच गट असतील. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपर आठमध्ये पोहोचतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल होईल. आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आलेले मोठे निर्णय >>पुरुषांच्या २०२७ आणि २०३१च्या वनडे वर्ल्डकपमध्ये १४ संघ असतील >>टी-२० वर्ल्डकपमध्ये २० संघ असतील >>२०२४,२०२६,२०२८ आणि २०३० मध्ये ५५ सामन्यांची स्पर्धा होईल >>२०२५ आणि २०२९ मध्ये आठ संघांची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाईल >>वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५, २०२७, २०२९ आणि २०३१ साली होतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vKsykD
No comments:
Post a Comment