मुंबई: भारतीय कसोटीमध्ये राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नंतर जर कोणाचे नाव समोर येत असेल तर चेतेश्वर पुजार आणि होय. या जोडीतील अजिंक्य रहाणेचा आज ३३वा वाढदिवस आहे. कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधार असलेल्या अजिंक्यने आतापर्यंत शानदार अशी कामगिरी केली आहे. फक्त फलंदाज म्हणून नव्हे तर विराटच्या गैरहजेरीत अजिंक्यने कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये भरवश्याचा खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षात अजिंक्य रहाणेकडे पाहिले जात आहे. फक्त एक फलंदाज नाही तर कर्णधार म्हणून देखील त्याची कामगिरी त्याला इतरांपेक्षा वेगळ करते. आयपीएलच्या १३व्या हंगामानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यातील पहिल्या लढतीत भारताचा मोठा पराभव झाला. या लढतीनंतर विराट मुलीच्या जन्मासाठी भारतात परतला होता. पहिल्या कसोटीत ३६ धावांवर ऑलआउट झाल्यानंतर भारताचा मालिकेत मोठा पराभव होईल असे बोलले जात होते. विराटच्या गैरहजेरीत भारताचे नेतृत्व अजिंक्यकडे आले आणि त्यानंतर जे झाले त्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी झाली. संपूर्ण मालिकेत प्रत्येक सामन्यानंतर भारताचे अनुभवी आणि स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होत होते. अशात अजिंक्यने शानदार नेतृत्व करून दाखवले आणि मालिकेत २-१ असा विजय मिळवला. वाचा- दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमी संघातून बाहेर झाला. पण अजिंक्यने जिद्द सोडली नाही. मेलबर्न कसोटीत भारताने ८ विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. तिसरी कसोटी सिडनीत झाली. त्या सामन्यात रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि हनुमा विहारी हे फिट असते तर भारताने विजय मिळवला असता. पण दुखापत असताना देखील भारतीय खेळाडूंनी मैदान सोडले नाही आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवू दिला नाही. मालिकेतील अखेरच्या कसोटीत भारताने ३ विकेटनी विजय मिळवाल आणि ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभूत केले. कर्णधार म्हणून अजिंक्यने कसोटीत एकाही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ५ कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी ४ मध्ये विजय तर एक सामना ड्रॉ झालाय. या शिवाय आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करताना सर्व सामन्यात विजय मिळून दिला आहे. आयपीएलमध्ये दोन शतक करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होतो. कसोटी क्रिकेटमध्ये फिल्डिंगमध्ये अजिंक्यच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याने एका कसोटी सामन्यात ८ कॅच घेतले आहेत. २०१५ साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात अजिंक्यने हा विक्रम केला होता. अजिंक्यनंतर ग्रेग चॅपल आणि युवराज सिंग या दोघांनी प्रत्येक सात कॅच घेतले आहेत. वयाच्या १२व्या वर्षी ब्लॅक बेल्ट अजिंक्य आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असला तरी वयाच्या १२व्या वर्षी त्याने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला होता. आज देखील वेळ मिळाल्यावर तो कराटेचा सराव करतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3im3vAS
No comments:
Post a Comment