Ads

Tuesday, December 24, 2019

वनडेत धोनीच किंग; पुन्हा दिले कर्णधारपद

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने सोमवारी एकदिवसीय क्रिकेटमधील या दशकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केली. या संघात तिघा भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कसोटी संघाप्रमाणे वनडे संघाचे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने सोमवारी या दशकातील कसोटी संघाची घोषणा केली होती. या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीला देण्यात आले होते. कसोटी संघात विराट वगळता अन्य भारतीय खेळाडूंचा समावेश केला नव्हता. कसोटी संघाप्रमाणेच वनडे संघाची देखील निवड करण्यात आली. या संघात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, विद्यमान कर्णधार आणि सलामीवीर या तिघांना स्थान देण्यात आले आहे. संघात रोहितला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. तर विराटला तिसऱ्या क्रमांकावरील जबाबदारी देण्यात आली आहे. तर कर्णधारपद धोनीकडे देण्यात आले आहे. वाचा- दशकातील सर्वोत्तम संघात तिघा भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली असली तरी एकाही पाकिस्तानच्या खेळाडूला या संघात घेण्यात आलेले नाही. अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन या दोघांना संघात स्थान देण्यात आले आहे. आफ्रिकेच्या संघातील एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम अमला यांना तर ऑस्ट्रेलियाच्या फक्त मिशेल स्टार्कचा संघात समावेश करण्यात आला आहे. वाचा- इंग्लंडच्या धडाकेबाज फलंदाज जोश बटलर, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसित मलिंगा यांना देखील ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. वाचा- अशा आहे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा संघ- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जोश बटलर, राशिद खान, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसित मलिंगा


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZkU1tT

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...