सिडनी: आई झाल्यानंतर करिअर सोडावे लागण्याची चिंता नोकरदार महिलांना असते. त्याच बरोबर नोकरी सोडावी लागल्यामुळे आर्थिक नुकसान देखील होत असते. क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास महिला खेळाडूंना एक वर्षापेक्षा अधिक काळ खेळापासून दूर रहावे लागते. पण ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने यासंदर्भात एक नवा आदर्श निर्माण करुन दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने आई होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वर्षाची सुट्टी आणि त्या काळातील वेतन देखील देण्यास सुरुवात केली आहे. या घटनेचा फायदा ऑस्ट्रेलिया संघातील क्रिकेटपटू हिला झाला आहे. क्रिकेट बोर्डाच्या या योजनेचा फायदा मिळणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. जेसला १२ महिन्याची सुट्टी आणि त्या काळातील पगार मिळणार आहे. वाचा- इतक नव्हे तर बाळाचा जन्म होण्याआधीपर्यंत ती क्रिकेट न खेळण्यासंदर्भातील निर्णय देखील घेऊ शकते. विशेष म्हणजे अशा प्रकारची योजना सुरु करणारे ऑस्ट्रेलिया हे पहिलेच क्रिकेट बोर्ड ठरावे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असेलल्या भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडे देखील अशा प्रकारची कोणतीही योजना नाही. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडुल्जीने सांगितले की, भारतात महिला क्रिकेटपटूंना अशा प्रकारची मातृत्वासाठीची सुट्टी मिळत नाही. तर टीम इंडियाकडून ६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या रीमा मल्होत्राच्या मते, बीसीसीआयकडे अशा प्रकारचे प्रकरण आले नाही. वाचा- जेस डफिन २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. जेसने मेलबर्न येथे झालेल्या टी-२० लीगमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. लीगमध्ये संघाचे नेतृत्व करत असताना जेस गर्भवती होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2tnrJ6k
No comments:
Post a Comment