मुंबई: रणजी स्पर्धेच्या इतिहासात मुंबई संघाला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आणि सारखे दिग्गज खेळाडू असताना अवघ्या तीन दिवसात मुंबईचा १० विकेटनी पराभव झाला. रणजी स्पर्धेतील ग्रुप बी मध्ये शुक्रवारी रेल्वेने ४७ धावांचे किरकोळ लक्ष्य एक ही विकेट न गमवता साध्य केले. रेल्वेने तब्बल ४१ वेळा रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवणऱ्या मुंबईवर १० गडी राखून विजय मिळवला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात रेल्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईचा पहिला डाव अवघ्या ११४ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात देखील त्यांना फार मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ सारखे उत्तम फलंदाज असताना मुंबईला दुसऱ्या डावात १९८ धावाच करता आल्या. वाचा- रहाणेने पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात आठ धावा केल्या. तर स्टार फलंदाज पृथ्वीने १२ आणि २३ धावा केल्या. मुंबईचा कर्णधार सुर्यकुमार यादवने पहिल्या डावात ३९ तर दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. मुंबई संघाकडे चांगला फलंदाज असताना देखील त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. रेल्वेने मुंबईच्या पहिल्या डावाला उत्तर देताना २६६ धावा केल्या होत्या. या धावांच्या जोरावर रेल्वेने पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. रेल्वेकडून पहिल्या डावात टी. प्रदीपने मुंबईचे सहा फलंदाज बाद केले. तर दुसऱ्या डावात हिमांशू सांगवान याने पाच विकेट घेतल्या. वाचा- या विजयासह रेल्वेला सात गुण मिळाले आहेत. मुंबई संघात पुढील सामना कर्नाटकविरुद्ध होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QsZHhk
No comments:
Post a Comment