नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवता आले नाही. भारतीय संघाने इंग्लंड येथे झालेल्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. पण सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्याविरुद्ध भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील तीन मिनिटे वगळता २०१९ वर्ष शानदार होते, अशी प्रतिक्रिया विराटने दिली होती. तर वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचेच दु:ख असल्याचे रोहित शर्माने म्हटले होते. वाचा- क्रिकेटचा विचार करता २०२० हे वर्ष भारतासाठी खास असे ठरू शकते. कारण पुढील वर्षी भारत एक दोन नव्हे तर तीन वर्ल्ड कप खेळणार आहे. २०२०मधील पहिली स्पर्धा म्हणजे दक्षिण आफ्रिकेत होणारा आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्ड कप होय. त्यानंतर आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुषाचा टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या या तिन्ही संघांना आयसीसीच्या या स्पर्धांचे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. वाचा- असे आहेत भारताचे सामने > श्रीलंकाचा भारत दौरा- ५ जानेवारी ते १० जानेवारी २०२० (तीन टी-२० सामने) > ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा- १४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२० (तीन वनडे सामने) > ICC १९ वर्षाखालील वर्ल्ड कप २०२० (पुरुष)- १७ ते ९ फेब्रुवारी २०२० > भारताचा न्यूझीलंड दौरा- २४ जानेवारी ते ४ मार्च २०२० (पाच टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी) > ICC महिला टी-२० वर्ल्ड कप २०२०- २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० > दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा- १२ मार्च ते १८ मार्च २०२० (तीन वनडे) > आयपीएल २०२०- २९ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता > भारताचा श्रीलंका दौरा- जून ते जुलै (तीन टी-२० आणि तीन वनडे) > आशिया कप स्पर्धा- सप्टेंबर २०२० > इंग्लंडचा भारत दौरा- सप्टेंबर ते ऑक्टोबर (तीन वनडे आणि तीन टी-२०) > भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा- ऑक्टोबर २०२० (तीन टी-२०) > ICC टी-२० वर्ल्ड कप २०२०- १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर > भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा- डिसेंबर २०२० ते जानेवारी २०१२ (चार कोटी आणि तीन वनडे) हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SGQMeV
No comments:
Post a Comment