मेलबर्न: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड () यांच्यात मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्ट () मॅचच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने शानदार शतकी खेळी केली. स्मिथच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला ४६७ धावांपर्यंत मजल मारता आली. स्मिथने २३४ चेंडूत ११४ धावा केल्या. कसोटमधील हे त्याचे २७वे शतक ठरले. यासह त्याने कसोटीमध्ये विराट कोहलीच्या शतकांची बरोबरी केली. दुसरा दिवस जसा स्मिथच्या शतकामुळे सर्वांच्या लक्षात राहिला तसाच तो स्मिथच्या विकेटमुळे देखील सर्वांच्या लक्षात राहिला. ऑस्ट्रेलिया संघातील सर्वात धोकादायक अशा स्मिथला न्यूझीलंडच्या हेन्नी निकोल्सने अफलातून कॅच घेऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हेन्नीने स्मिथचा कॅच केवळ तीन बोटांमध्ये घेतला. हेन्नीने घेतलेला कॅच पाहून स्मिथला देखील आश्चर्य वाटले. बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर उभा होता. तर न्यूझीलंडचा संघ कमबॅकची संधी शोधत होता. वाचा- स्मिथला बाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बाऊसर चेंडू टाकण्यास सुरुवात केली आणि नेमका न्यूझीलंडच्या या जाळ्यात स्मिथ अडकला. सामन्यात नील वॅग्नरने १०५व्या षटकातील चौथा चेंडू उसळता टाकला. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्मिथने केला. पण अखेरच्या क्षणी तो न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला आणि नेमका तेव्हाच चेंडू त्याच्या ग्लव्ह्ज लागून गलीमध्ये गेला. तेथे उभ्या असलेल्या हेन्नीने मागच्या बाजूला उडी घेत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या तीन बोटात चेंडू सापडला. हेन्नीच्या या भन्नाट कॅचचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटवर शेअर केला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६७ धावा केल्या आहेत. स्मिथने सर्वाधिक ११४ तर कर्णधार टीम पेन याने ७९ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने दोन बाद ४० धावा केल्या होत्या. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34VbwlK
No comments:
Post a Comment