Ads

Sunday, December 29, 2019

क्रिकेट मैदानावरील बाप लेकीच्या नात्याचा व्हिडिओ व्हायरल!

मुंबई: क्रिकेटच्या मैदानावरील अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. फलंदाजाची एखादी अप्रतिम खेळी अथवा गोलंदाजाने केलेली शानदार कामगिरीचे व्हिडिओ व्हायरल होतात. तसेच एखाद्या क्षेत्ररक्षकाने घेतलेला कॅच अथवा केलेल्या रन आऊटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मुंबईत सुरू असलेल्या टी-२० लीगमधील एका व्हिडिओची सध्या भरपूर चर्चा होत आहे. मुंबई टी-२० लीगमधील एक सामना वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यातील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याचे शूट करणाऱ्या कॅमेरामनचे कुटुंबीय यावेळी मैदानावर आले होते. कॅमेरामनची पत्नी आणि मुलगी सामना पाहत होते. ओव्हर संपल्यानंतर कॅमेरामनने पत्नी आणि मुलांकडे कॅमेरा फिरवला. वाचा- ही घटना मैदानावर लागलेल्या मोठ्या स्क्रीनवर देखील दिसली. स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. वडिलांना हात उंच करून तिला झालेला आनंद व्यक्त केला. त्याच वेळी दुसऱ्या कॅमेऱ्यावर तिच्या वडिलांना दाखवण्यात आले. कॅमेरामन वडिलांनी देखील मुलीला हात उंच करून तुला पाहिल्याचे सांगितले. जेव्हा मुलीला कॅमेऱ्यावर दाखवले तेव्हा तिच्या हातात एक पोस्टर होते. त्यावर लिहले होते की, 'माझे वडील कॅमेऱ्याच्या मागे आहेत'. वाचा- या व्हिडिओतील मुलीचा आनंद पाहण्यासारखा आहे. सोशल मीडियावर तिच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया सर्वांना आवडली. मुंबई टी-२०ने हा व्हिडिओ शेअर केला. २४ डिसेंबर रोजी अपलोड केलेल्या हा व्हिडिओला एक लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युझरने म्हटले आहे, 'वडील आणि मुलीचे प्रेम किती सुंदर असते, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते'. तर दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे की,'आतापर्यंत मी वडील आणि मुलीचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. पण या व्हिडिओने माझे मन जिंकले. मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद अप्रतिम आहे'. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Q3HM1P

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...