कराची: विश्वात सध्या प्रकरण गाजत आहे. यासंदर्भात काल माजी क्रिकेटपटू याने आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्याआधी माजी कर्णधार इंझमाम उल-हक याने देखील पाक संघात असे काहीच घडले नसल्याचे म्हटले होते. आता यावर खुद्द दानिशने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. सुरुवातच जय श्री रामाने दानिशने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तो, नमस्कार, सलाम, जय श्री राम अशा वाक्याने करतो. गेल्या काही दिवसात तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंब्याला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. या व्हिडिओत त्याने आरोप केला की, पाकिस्तानने अशा खेळाडूंचे स्वागत केले ज्यांनी देशाला विकले. वाचा- काही लोकांच्या मते, फुकटची लोकप्रियता मिळवण्यासाठी मी या गोष्टींवर बोलत आहे. पण लोक हे विसरत आहेत की, सर्व प्रथम शोएब अख्तरने या गोष्टीचा खुलासा केला होता. खेळताना जे काही घडले ते मी सहन केले. त्याबद्दल कधीच बोललो नाही. नेहमी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले. क्रिकेट तर दुरच राहिले. या लोकांनी मला वृत्तवाहिन्यांवर देखील काम करु दिले नाही, असा आरोप दानिशने केला. वाचा- निवृत्ती ज्या क्रिकेटपटूंनी देशाला विकले. जे तुरुंगात जाऊन आले आणि पुन्हा क्रिकेट खेळू लागले, त्यांचा सन्मान केला जातो. मी कधीच पैसे घेतले नाहीत आणि माजी चूक देखील स्विकारल्याचे दानिश म्हणाला. दानिशवर २०१२मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंगचा आरोप केला होता. यात दोषी आढळल्यानंतर बोर्डाने त्याच्यावर बंदी देखील घातली होती. दानिशवरील या कारवाईनंतर पाक बोर्डाने देखील त्याला संघातून वगळले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Qwx6I3
No comments:
Post a Comment