नवी दिल्ली: भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी आपल्याकडील क्रिकेटच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. बॅट आणि चेंडूची सोय झाली की क्रिकेटचा खेळ भारतातील कोणत्याही गल्ली बोळात सुरु होता. क्रिकेटचा असाच एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक स्तरावरील क्रिकेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता जो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहिल्यानंतर क्रिकेटची आवड असेल तर एखादी व्यक्ती शारीरिक व्यंगावर देखील मात करू शकते याचा प्रत्यय येईल. एका मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्या सोबत एक दिव्यांग मुलगा देखील आहे. अन्य खेळाडूंना कोणतेही शारीरिक व्यंग नाही. दिव्यांग मुलगा फलंदाजी करत आहे. दोन्ही पायाने चालता न येणाऱ्या या मुलाने शॉट मारला आणि गुढघ्यावर धावत दुसऱ्या विकेटपर्यंत पोहोचला. ISF अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर मुलाच्या जिद्दीचे कौतुक करत आहेत. वाचा- रमन यांनी २६ डिसेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'माझ्याकडे शब्द नाहीत. केवळ क्रिकेट आवडणाऱ्या नाही तर न आवडणाऱ्यांनी देखील हा पाहिला पाहिजे. हा व्हिडिओ मला फेसबुकवर मिळाला. या मुलाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल', असे रमन यांनी म्हटले आहे. दिव्यांग मुलगा फलंदाजी करत असताना शॉट मारतो आणि हाताच्या मदतीने धावत रन पूर्ण करतो. रन पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा बॅट ( दोन्ही फलंदाजांसाठी एकच बॅट असल्यामुळे) देण्यासाठी पुन्हा पिचच्या मध्यापर्यंत जातो. हा व्हिडिओ आतापर्यंत ७१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याला पाच हजारहून अधिक लाईक्स तर दोन हजारहून अधिक वेळा तो रि-ट्विट झाला आहे. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39sKDJA
No comments:
Post a Comment