नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाला हिंदू असल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दलचा खुलासा झाल्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू असल्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडू दानिश सोबत जेवण्यास देखील जात नसत, असा खळबळजनक खुलासा माजी जलद गोलंदाज याने केला होता. शोएबने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या असल्याचे दानिशने म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाला, भारतात मोहम्मद अझरुद्दीन अनेक वर्ष कर्णधार होते. आता पाकिस्तानमध्ये असे प्रकार झाल्याचे उघड होत आहे जेथे पंतप्रधानच एक क्रिकेटपटू होते. दानिशने पाकसाठी कसोटी सामने खेळले आहेत. तरी देखील त्याला अशा प्रकारची वागणूक दिली जाते हे लाजिरवाणी गोष्ट आहे. वाचा- दानिशसोबत जे काही झाले त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा दिसल्याचे गंभीर म्हणाला. या प्रकरणावर बोलताना दानिशने सांगितले, शोएब एक महान खेळाडू आहे. तो गोलंदाजीप्रमाणेच खरे बोलतो. या प्रकरणावर कधी बोलण्याची माझी हिम्मत नव्हती. पण शोएबच्या बोलण्यामुळे हिम्मत आली आहे. पाकिस्तानकडून खेळताना इंझमाम उल हक, मोहम्मद युसूफ आणि युनिस खान यांनी नेहमी मला साथ दिली. ज्यांनी मला त्रास दिला त्यांची नावे मी लवकरच जाहीर करणार आहे. दानिशच्या नावावर आहे विक्रम पाकिस्तानकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू अशी दानिशची ओळख आहे. पाककडून ६१ कसोटी तर १८ वनडे खेळल्या. दानिशने कसोटीत २६१ तर वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत. जुलै २०१०मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. भारताविरुद्ध दानिशने ६ कसोटीत ३१ विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानकडून अब्दुल कादिरने ६७ कसोटीत २३६, शकलेन मुश्ताकने ५२ कसोटीत २०८ विकेट घेतल्या आहेत. वाचा- हा होता पहिला पाक हिंदू क्रिकेटपटू अनिल दलपत हा पाकिस्तानकडून खेळणारा पहिला क्रिकेटपटू होतो. अर्थत दलपत यांचे करिअर फक्त दोन वर्षाचे ठरले. १९८४-८६ ही दोन वर्ष ते पाकिस्तानकडून खेळले. या काळात त्यांनी नऊ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले. दलपत विकेटकीपर आणि फलंदाज होते. पण त्यांना फार यश मिळाले नाही. टेस्टमध्ये त्यांनी १६७ तर वनडेत ८७ धावा केल्या. विकेटकीपर म्हणून दलपत यांनी कसोटीत २५ तर वनडेत १५ विकेट घेतल्या. वाचा- इम्रानवर गंभीर आरोप अनिल दलपत यांनी २००२मध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. इम्रान यांच्यामुळे त्यांचे क्रिकेट करिअरचे वाटोळे झाले, असा आरोप त्यांनी केला होता. इम्रान यांच्यामुळे मला कमी क्रिकेट खेळण्यास मिळाल्याचे ते म्हणाले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Q4HeZL
No comments:
Post a Comment