नवी दिल्ली: जगतात २०१९मध्ये अनेक विक्रम झाले. कसोटी क्रिकेटचा विचार करता अनेक सामन्याचे निकाल लागले. खुप कमी सामने असे होते की जे ड्रॉ झाले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका आणि भारतीय संघाच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. जाणून घेऊयात २०१९मध्ये क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झालेल्या गोष्टी... >> या वर्षातील सर्वात यशस्वी संघाचा विचार केल्यास भारतीय संघाचे नाव सर्वात आघाडीवर येते. २०१९मध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी सर्वाधिक ८७.५० इतकी आहे. भारतीय संघाने आठ सामने खेळले त्यापैकी सातमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे या वर्षी टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावला नाही. भारतीय संघाचा तीन जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ झाला होता. >> भारतीय संघानंतर विजयाची टक्केवारी ऑस्ट्रेलिया संघाची आहे. ऑस्ट्रेलियाने १२ सामन्यांपैकी आठमध्ये विजय आणि दोनमध्ये पराभव स्विकारला. त्यांचे दोन सामने ड्रॉ झाले. कमीत कमी आठ कसोटी सामने खेळणाऱ्या संघांमध्ये इंग्लंडची कामगिरी सर्वात खराब ठरली. इंग्लंडने १२ पैकी फक्त चारमध्ये विजय मिळवला तर सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला. >> २०१९मधील अधिकतर कसोटी सामने निकाली निघाले. या वर्षी सर्वात कमी सामने ड्रॉ झाले. वर्षाच्या अखेरीस झालेले दोन्ही बॉक्सिंग डे टेस्ट मॅचचा निकाल लागला. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला. >> या वर्षात फक्त १०.२६ टक्के टेस्ट मॅच ड्रॉ झाले. ज्या वर्षी कमीत कमी १० कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये ही सर्वोत्तम कामगिरी आहे. >> २०१९मध्ये ३९ कसोटी सामने खेळले गेले त्यापैकी फक्त चार सामने ड्रॉ झाले. पहिला ड्रॉ झालेला सामना म्हणजे सिडनी येथील ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, दुसरा न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, तिसरा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि चौथा इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ड्रॉ झाला. १९७० नंतर कसोटी क्रिकेटसाठी हे वर्ष शानदार ठरले. २०१८मध्ये ४८ पैकी ५ कसोटी सामने ड्रॉ झाले होते. >> भारताचा कर्णधार विराट कोहलीने २२२ वनडे डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २७६ डावातील ११ हजार धावा करण्याचा विक्रम मागे टाकला. >> ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन याने कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला. त्याने ११ कसोटीतील १६ डावात ६४.९४च्या सरासरीने एक हजार १०४ धावा केल्या. विशेष म्हणजे सर्वाधिक धावा करणाऱ्या या फलंदाजाने या वर्षात फक्त दोन षटकार मारलेत. >> २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने कमी डावात सात हजार धावा पूर्ण केल्या. स्मिथने १२६ डावात ही कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या वॉली हॅमंडचा १३१ डावाचा विक्रम मागे टाकला. >> वेस्ट इंडिजच्या जॉन कॅम्बल आणि शाई होप या जोडीने आयर्लंडविरुद्ध वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी ३६५ धावांची भागिदारी केली. वनडे क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागिदारी आहे. >> रणजी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर विजय मिळवला. झारखंडने (१३६ आणि ४१८) त्रिपूराचा (२८९ आणि २११) ५४ धावांनी पराभव केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2F4u34J
No comments:
Post a Comment