Ads

Saturday, December 28, 2019

क्रिकेट: २०२० 'हे' दिग्गज खेळाडू घेऊ शकतात निवृत्ती

नवी दिल्ली: भारतीय संघाने आणि क्रिकेटपटूंनी शानदार कामगिरी करत २०१९ हे वर्ष गाजवले. देश असो की परदेशात भारतीय संघांने अनेक मोठे विजय मिळवले. खेळाडूंनी देखील अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. टीम इंडिया २०२०मध्ये देखील अशीच कामगिरी करेल अशी अशा आहे. २०२०ची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेने होत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि मग न्यूझीलंडचा मोठा दौरा आहे. यासह टी-२० वर्ल्ड कप हे देखील एक मोठे आव्हन भारतीय संघासमोर असणार आहे. अशातच टीम इंडियातील काही दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. प्रत्येक खेळामध्ये फिटनेस हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. सारख्या खेळात तर तो अधिक महत्त्वाचा ठरतो. क्षेत्ररक्षण करत असताना आणि फलंदाजीकरत असताना दोन्ही वेळा फिटनेस असेल तरच सर्वोत्तम कामगिरी करता येते. क्रिकेटमध्ये सर्वसाधारणपणे ३५ ते ४० या वयात निवृत्ती घेतली जाते. २०१९मध्ये युवराज सिंग, अंबाती रायडू सारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली. आता २०२०मध्ये देखील काही खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. येणाऱ्या वर्षात जे खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात अशांमध्ये तिघांचा समावेश प्रमुख्याने करावा लागेल. वाचा- विक्रमाची नोंद २०२०मध्ये जे खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात अशांमध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे महेंद्र सिंह धोनी होय. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने २००४मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. त्यानंतर धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर बनला. धोनीने २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीमचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तो कसोटी आणि वनडेचा देखील कर्णधार झाला. धोनीने अनेक वर्षे भारताच्या मधल्या फळीला आधार दिला. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १७ हजार धावा आहेत. टी-२०, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला कर्णधार आहे. आता धोनीचे वय ३८ आहे आणि त्याच्या कामगिरीवर देखील परिणाम होत आहे. वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडच्या विरुद्ध झालेल्या सेमीफायनलनंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही. यामुळेच धोनी २०२०च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर करू शकतो. २०२०मध्ये निवृत्त घेण्याची शक्यता असलेला दुसरे मोठे नाव म्हणजे रविचंद्रन अश्विन होय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अश्विनची करिअरच बदलले. २०१०मध्ये त्याने भारताकडून खेळण्यास सुरुवात केली. अनेक वर्ष अश्विन भारताचा मुख्य फिरकीपटू राहिला आहे. २०१७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने अखेरचा टी-२० सामना खेळला होता. पण त्यानंतर यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली. अश्विनने तिन्ही प्रकारात मिळून २८६ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजी सोबत त्याने फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली असून कसोटीत त्याच्या नावावर दोन हजारहून अधिक धावा आहेत. सध्या टी-२० आणि वनडे संघात अश्विनला कोणतेही स्थान नाही. तो फक्त भारताकडून कसोटी खेळतो. जर टी-२० वर्ल्ड कपमध्ये अश्विनला संधी मिळाली नाही तर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता असलेला तिसरा खेळाडू म्हणजे होय. रैनाने २००५मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. त्याने अनेक वर्ष मधली फळी सक्षमपणे सांभाळली. २०११च्या वर्ल्ड कप संघात रैना होता. वनडेमध्ये त्याने ५ हजार धावा आणि ५ शतके केली आहेत. टी-२० प्रकारात भारताकडून शतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. रैनाने जुलै २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचा वनडे आणि टी-२० सामना खेळला होता. आता त्याला टी-२० वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळेल का हे पहावे लागेल. जर तसे झाले नाही तर फक्त आयपीएल खेळणे हा एक पर्याय रैना समोर असेल. त्यामुळेच २०२०मध्ये रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37hgCdz

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...