नवी दिल्ली: दिल्ली आणि जिल्हा असोसिएशन () पदाधिकाऱ्यांनी केलेल्या राड्यामुळे चर्चेत आली आहे. रविवारी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी बैठकीला बॉक्सिंग रिंगचे स्वरुप आणले. डीडीसीएला येत्या १३ जानेवारी रोजी नवा अध्यक्ष निवडायचा आहे. सर्व ठरल्याप्रमाणे झाले तर नवा अध्यक्ष हा बीसीसीआयच्या अध्यक्षाप्रमाणे एक माजी क्रिकेटपटू असेल. पत्रकार रजत शर्मा यांनी डीडीसीएचे अध्यक्षपद सोडल्यानंतर हे पद रिक्त आहे. दिल्ली असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षपद भाजपचे खासदार गौतम गंभीरने () स्विकारावे अशी विनंती केली आहे. अध्यक्षपदासाठी रणनिती निश्चित झाली असून सर्व नियोजनानुसार झाल्यास माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार हा डीडीसीएचा नवा अध्यक्ष असेल. वाचा- डीडीसीएचा कारभार पुन्हा सुरळीत होण्यासाठी पदाधिकारी गौतम गंभीरला अध्यक्षपद देण्याचा आग्रह करत आहेत. गंभीरच ही जबाबदारी पार पाडू शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधारासोबत चर्चा झाली आहे. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. डीडीसीएचा कारभार तोच मार्गावर आणू शकतो, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. दिल्ली क्रिकेटसाठीचे गंभीरचे योगदान मोठे आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली प्रशासकाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडात असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच डीडीसीएसाठी गंभीर हाच उत्तम पर्याय असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रविवारी डीडीसीएच्या बैठकीत झालेल्या मारहाणीच्या घटनेवर गंभीरने ट्विटकरुन राग व्यक्त केला होता. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3687YxS
No comments:
Post a Comment