मेलबर्न: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात मेलबर्न मैदानावर झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये यजमान संघाने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ मेलबर्न येथे ही न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. बॉक्सिंग डे टेस्ट मॅच पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली. या सामन्यात न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्स याला पहिल्याच ओव्हरमध्ये बोल्ड केले. या बोल्डचा व्हिडिओ व्हायरल झाला. बोल्टचा चेंडू हवेत स्विंग झाला आणि बर्न्सला तो कधी बाद झाला हे कळाले देखील नाही. त्यानंतर हेन्नी निकोल्सने दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथचा घेतलेला टेक ऑफ कॅचचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या सामन्यातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाचा- न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने कमाल केली. विकेटकिपर पेन याने अप्रतिम स्टपिंग केले आणि सर्वांना आठवला तो भारताचा दिग्गज विकेटकिपर महेंद्र सिंह धोनी होय. रविवारी ३०व्या षटकात नाथन लायनच्या चेंडूवर पेन याने न्यूझीलंडच्या हेन्नी निकोल्स याला बाद केले. पेन याने काही मायक्रो सेंकदात हेन्नीला बाद केले. या स्टपिंगचा व्हिडिओ आयसीसीने ट्विटवर शेअर केला आहे. आयसीसीने कर्णधार पेनचे शानदार काम, अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६७ धावा केल्या होत्या. बदल्यात न्यूझीलंडचा पहिला डावा केवळ १४८ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६८ धावांवर घोषित करत न्यूझीलंडला ४८८ धावांचे लक्ष्य दिले. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात देखील निराशा केली. न्यूझीलंडकडून टॉम ब्लंडेल याने शतकी (१२१) खेळी केली. ब्लंडेल वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना २४७ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असून दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2F1nqjF
No comments:
Post a Comment