मेलबर्न: यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धचा ( vs ) दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊडवर झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २४७ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पर्थ येथे झालेला पहिला कसोटी सामना देखील २९६ अशा मोठ्या फरकाने जिंकला होता. वाचा- बॉक्सिंग डे टेस्ट मॅच () मध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला रोखले होते. पण स्टिव्ह स्मिथ, कर्णधार टीम पेन यांची अर्धशतकी खेळी आणि ट्रॅव्हिस हेड याची शतकी खेळी यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६७ धावा केल्या. उत्तरादाखल न्यूझीलंडने पहिल्या डावात फक्त १४८ धावा केल्या. किवीकडून टॉम लॅथम याने सर्वाधिक ५० धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती आणि दुसरा डावात १६८ धावांवर घोषित करून त्यांनी न्यूझीलंडला ४८८ धावांचे टार्गेट दिले होते. पण न्यूझीलंड दुसऱ्या डावात २४० धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात टॉम ब्लंडेल याने शतकी खेळी केली. ब्लंडेल वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वाचा- या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2sl3DJi
No comments:
Post a Comment