नवी दिल्ली: भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला जोरदार विरोध होत असतानाच पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने जगासमोर स्वत:च्या देशात हिंदू क्रिकेटपटूंना कशा प्रकारे वागणूक दिली जाते याचा खळबळजनक खुलासा केला होता. शोएबच्या या वक्तव्याचा व्हिडिओ गुरुवारी भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एका चॅट शोमध्ये शोएबने पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू हिंदू क्रिकेटपटूंसोबत जेवत देखील नसत असे म्हटले होते. शोएबच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली होती. त्याच्या या वक्तव्यावर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर फार कमी लोकांना माहित आहे की पाकिस्तानच्या ६७ वर्षाच्या इतिहासात फक्त दोन क्रिकेटपटू आहेत जे हिंदू होते. पाकमधील अनेक हिंदू क्रिकेटपटू होते. त्यापैकी फक्त दोघांना संघात स्थान मिळवता आले. दानिशने मान्य केलेशोएबने पाकचा माजी फिरकीपटू संदर्भात जे वक्तव्य केले होते, ते खरे असल्याचे दानिशने मान्य केले. हिंदू क्रिकेटपटूंसोबत संघातील खेळाडू निट वागत नाहीत, हे खरे असल्याचे दानिशने सांगितले. दानिशच्या या वक्तव्यानंतर भारतात सोशल मीडियावर शेजारच्या देशात हिंदूवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरु आहे. वाचा- भारताच्या क्रिकेट इतिहासात एका बाजूला अनेक मुस्लिम क्रिकेटपटूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आणि शानदार कामगिरी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या ६७ वर्षाच्या इतिहासात फक्त दोन क्रिकेटपटू हिंदू होते. त्यातील एक नाव म्हणजे दानिश कनेरिया आणि दुसरे म्हणजे होय. पाकने भारतासोबत खेळला होता पहिली टेस्ट पाकिस्तान संघाने ऑक्टोबर १९५२मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना भारताविरुद्ध दिल्लीत झाला होता. या कसोटी सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवला होता. अब्दुल करदारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला पाच सामन्यांच्या मालिकेत १-२ अशा पराभव स्विकारावा लागला होता. वाचा- हा होता पहिला पाक हिंदू क्रिकेटपटू अनिल दलपत हा पाकिस्तानकडून खेळणारा पहिला क्रिकेटपटू होतो. अर्थत दलपत यांचे क्रिकेट करिअर फक्त दोन वर्षाचे ठरले. १९८४-८६ ही दोन वर्ष ते पाकिस्तानकडून खेळले. या काळात त्यांनी नऊ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले. दलपत विकेटकीपर आणि फलंदाज होते. पण त्यांना फार यश मिळाले नाही. टेस्टमध्ये त्यांनी १६७ तर वनडेत ८७ धावा केल्या. विकेटकीपर म्हणून दलपत यांनी कसोटीत २५ तर वनडेत १५ विकेट घेतल्या. इम्रानवर गंभीर आरोप अनिल दलपत यांनी २००२मध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. इम्रान यांच्यामुळे त्यांचे क्रिकेट करिअरचे वाटोळे झाले, असा आरोप त्यांनी केला होता. इम्रान यांच्यामुळे मला कमी क्रिकेट खेळण्यास मिळाल्याचे ते म्हणाले होते. दानिश दुसरा पाक हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटपटू ठरला. त्याने पाककडून ६१ कसोटी तर १८ वनडे खेळल्या. दानिशने कसोटीत २६१ तर वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत. जुलै २०१०मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. भारताविरुद्ध दानिशने ६ कसोटीत ३१ विकेट घेतल्या होत्या. २००९मध्ये एसेक्स संघाकडून खेळताना दानिश स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घातली होती. शोएब खर बोलतोय- दानिश शोएब अख्तरने चॅट शोमध्ये सांगितलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. पाकिस्तान संघातील अनेक खेळाडू माझ्यासोबत जेवत देखील नसत. मी हिंदू असल्यामुळे काही जण माझ्याशी बोलत नव्हते. ही गोष्ट सांगण्याची माझ्यात हिम्मत नव्हती आता त्या खेळाडूंची नावे मी जाहीर करु शकतो, असे दानिश म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37e6lPr
No comments:
Post a Comment