नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये एखादा कॅच अथवा रन आऊट सामन्याचा निकाल फिरवतो. त्यामुळेच 'कॅचेस विन मॅचेस' असे म्हटले जाते. २०१९ या वर्षात कसोटी, वनडे आणि टी-२० प्रकारात एकापेक्षा एक शानदार असे सामने पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षणाला देखील तितकेच महत्त्व आले आहे. या वर्षात क्रिकेटमधील शानदार कॅचचा हा आढावा... १) (वर्ल्ड कप) वर्ल्ड कप २०१९मधील पहिल्याच सामन्यातील एक शानदार कॅच घेतला गेला. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात आदिल रशीदच्या चेंडूवर आफ्रिकेच्या अँडिल फेहलुक्वायो याने शॉट मारला. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडूवर षटकार नक्की होता. पण बेन स्टोक्सने हवेत मागच्या बाजूला उडी घेत सीमारेषेवर चेंडू हवेत पकडला. २०१९मधील हा सर्वोत्तम कॅच मानला जातो. स्टोक्सने हा कॅच कसा घेतला हे सर्वांना रि प्ले पाहिल्यानंतर लक्षात आले. वाचा- २) (पर्थ कसोटी) बंदीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन झालेल्या स्टिव्ह स्मिथसाठी हे वर्ष शानदार असे ठरले. फलंदाजीत त्याने शतक आणि द्विशतकी खेळी केली. न्यूझीलंडविरुद्ध पर्थ येथे झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा अफलातून कॅच धरला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथ (steve smith) ने हवेत झेप घेत एक शानदार झेल घेतला आणि केन विल्यमसन (kane williamson) ला बाद केले. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टार्कच्या एका चेंडूने विल्यमसनच्या बॅटला स्पर्श केला. तेव्हा स्लीपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर उभ्या असलेल्या स्मिथने डाव्या बाजूला हवेत झेप घेत कॅच घेतला. अवघ्या ४ सेंकदात स्मिथने विल्यमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वाचा-३) (वल्ड कप) वेस्ट इंडिजचा शेल्डन कोट्रेल हा त्याच्या सॅल्यूटिंग सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. एखाद्या फलंदाजाला बाद केल्यानंतर तो सॅल्यूट करतो. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात थॉमसच्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथने शॉट मारला. हा चेंडू सीमेपलिकडे जाणार हे जवळपास निश्चित होते. पण कोट्रेलने धावत जात चेंडू हवेत धरला. या वर्षातील सर्वोत्तम कॅचमध्ये कोट्रोलने घेतलेल्या कॅचचा समावेश होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35aI8rT
No comments:
Post a Comment