नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू याने पाकिस्तानचा माजी कर्णधार मियांदादला कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. 'भारत सुरक्षित नाही, त्यामुळे 'आयसीसी'ने अन्य देशांतील क्रिकेट संघाना भारताचा दौरा करण्यापासून रोखावे,' असं मियांदाद म्हणाला होता. त्यावर 'मियांदादची जुनी खोड अजून मोडलेली नाही,' असा टोला कांबळीने लगावला. विनोद कांबळीने हे ट्विट केलं आहे. तो लिहितो, 'मियांदाद, तुमची जुनी खोड गेलेली नाही. रिटायरमेंटनंतरही तुमची सवय सुरूच आहे. आमचा देश सुरक्षित आहे आणि आम्ही प्रत्येक पाहुण्या देशाला सर्वश्रेष्ठ सुरक्षा दिली आहे. तुम्ही हे पाहा की कोणता अन्य देश आता पाकिस्तानात येऊ इच्छितो.' एका मुलाखतीत म्हणाले होते, 'पाकिस्तान नव्हे तर भारत सध्या असुरक्षित आहे. भारतात गेलेले पर्यटक असुरक्षित आहेत. माणूस म्हणून आपल्याला या विरोधात उभे राहायला हवे. तसेच भारतात जे काही सुरू आहे याचा विरोध करायला हवा. संपूर्ण जग पाहत आहे की, भारतात सध्या काय होत आहे. मला वाटते की, भारतासोबत सर्व खेळाचे संबंध तोडायला हवेत. सर्व देशांनी भारताविरुद्ध कडक पावलं उचलायला हवीत.' पाकिस्तानात १० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटची घरवापसी झाली आहे आणि श्रीलंका तेथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. ही मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली. २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर पाकिस्तानात दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हापासून कोणताही देश कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात गेलेला नाही. दरम्यान, पाकिस्तान आता तीन टी-२० आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामने जानेवारीत बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. सुरक्षाच्या कारणांसाठी पाच वनडे सामने खेळणार नसल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39f7HeF
No comments:
Post a Comment