Ads

Sunday, December 29, 2019

२०२०मध्ये पाच विक्रमांवर विराटची नजर; सचिनला टाकू शकतो मागे!

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार याच्यासाठी २०२० हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. या दशकात विराटने अनेक केले आहेत. आता नव्या वर्षात देखील असेच विक्रम विराट स्वत:च्या नावावर करू शकतो. विशेष म्हणजे विराट समोर असलेल्या विक्रमांपैकी अनेक विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. जाणून घेऊयात विराटला कोणत विक्रम करण्याची संधी आहे. >> वनडे करिअरमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ३०९ सामन्यातील ३०० डावात १२ हजार धावा केल्या होत्या. सध्या विराटने २४२ सामन्यातील २३३ डावात ११ हजार ६०९ धावा केल्या आहेत. विराट ज्या पद्धतीने सध्या खेळत आहे त्याचा विचार करता पुढील वर्षी सचिनचा हा विक्रम तो सहज मोडू शकले. >> सचिनने वनडे करिअरमध्ये १६० डाव घरच्या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी २० डावात त्याने शतकी खेळी केली होती. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने घरच्या मैदानावर इतकी शतके केली नाहीत. सचिनचा हा विक्रम विराटच्या नजरेसमोर आहे. विराटने ८९ डावात घरच्या मैदानावर १९ वनडे शतके केली आहेत. फक्त दोन शतकी खेळी केल्यास विराट सचिनला मागे टाकेल. >> वनडेमध्ये विराटच्या नावावर २४२ सामन्यात ४३ शतकांची नोंद आहे. तर सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकण्यासाठी विराटला फक्त सात शतकांची गरज आहे. विराटची कामगिरी पाहता हे लक्ष्य फार लांब नाही. >> कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधाराचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला आहे. विराटने ५३ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी ३३ वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. विराटने आणखी आठ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केल्यास तो माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला मागे टाकेल. धोनीच्या नावावर सर्वाधिक ६० कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचा विक्रम आहे. भारतीय संघ नव्या वर्षात न्यूझीलंड दौऱ्यावर जात असून फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. >> कसोटीमध्ये सर्वात वेगाने आठ हजार धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकाराने ९१ सामन्यातील १५२ डावात आठ हजार धावा केल्या होत्या. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर (९६ सामन्यातील १५४ डाव) आहे. विराटने ८४ सामन्यात सात हजार २०२ धावा केल्या आहेत. संगकाराचा विक्रम मागे टाकण्यासाठी विराटला पुढील काही कसोटींमध्ये मोठ्या खेळी कराव्या लागतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39oNov8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...