कराची: हिंदू असल्यामुळे दानिश कनेरियासोबत कोणी जेवण्यास बसत नसे, असे वक्तव्य करून खळबळ उडवणाऱ्या शोएब अख्तरने आता युटर्न घेतला आहे. पाकिस्तानच्या माजी जलदगती गोलंदाजाने दानिश संदर्भात केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, असे शोएबने म्हटले आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू हिंदू असल्यामुळे काही लोकांना तो संघात नको होता. धर्माच्या आधारावर खेळाडूशी भेदभाव करण्याची संस्कृती पाकिस्तान संघात नसल्याचे शोएबने सांगितले. संघातील काही खेळाडू दानिशला टार्गेट करत होते. पण त्याच्यावर कधीच धर्म बदलण्यासाठी दबाव आणला गेला नाही. वाचा- माझ्या वाक्यावरून सुरू असलेला गदारोळ मी पाहत आहे. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. संघातील १-२ खेळाडूंनी दानिश संदर्भात टिप्पणी केली होती. पण अन्य कोणत्याही खेळाडूंनी त्याला प्रोत्साहन दिले नाही. उलट अशा खेळाडूंना सक्त ताकीद देण्यात आली. मी फक्त संघातील १-२ खेळाडूंबद्दल बोललो होतो. अशा प्रकारची घटना तर प्रत्येक संघात होते, असे अख्तरने स्पष्टीकरणात सांगितले. वाचा- दानिशने पाकिस्तानला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दानिश १० वर्ष पाकिस्तानकडून खेळल्याचे अख्तर म्हणाला. पाकिस्तानकडून खेळताना दानिशने ६१ कसोटी सामन्यात २६१ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याला दोषी ठरवले आणि बंदी घातली. या बंदीमुळे दानिशला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले. स्पॉट फिक्सिंगमुळे दानिशला संघातून वगळण्यात आले होते ना की धर्माच्या कारणामुळे, असे ही अख्तर म्हणाला. वाचा- यासंदर्भात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल-हल याने देखील शनिवारी स्पष्टीकरण दिले. दानिश सर्वाधिक काळ माझ्या नेतृत्वाखाली खेळला आहे. त्याच्या सोबत कधीच अशा प्रकारची घटना झाली नाही. वाचा- काय म्हणाला इंझमाम:
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2t8CsBt
No comments:
Post a Comment