मेलबर्न: चार देशांची वनडे सुपर सीरिज खेळवण्याच्या बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) प्रस्तावाचे ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष केव्हिन रॉबर्ट्स ( Kevin Roberts) यांनी कौतुक केले आहे. गांगुलीने चार देशांची वनडे सुपर सीरिज स्पर्धा २०२१ मध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह अन्य एक आघाडीचा संघ असेल. यासंदर्भात लंडनमध्ये गांगुलीसोबत झालेल्या बैठकीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या प्रस्तावावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. रॉबर्ट्स यांनी गांगुलीचा प्रस्ताव चांगला असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक वर्षी एक स्पर्धा आयोजित करण्याचा ICCचा प्रयत्न रोखण्याच्या दृष्टीने गांगुलीने हा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. वाचा- बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांचा सुपर सीरिजचा () प्रस्ताव नाविन्यपूर्ण आहे. गांगुलीच्या कार्यकाळात कोलकातामध्ये डे-नाईट कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. आता सुपर सीरिजचा प्रस्ताव देखील लाखात एक असल्याचे रॉबर्ट्स यांनी म्हटले आहे. पुढील महिन्यात रॉबर्ट्स भारतात येणार आहेत. या दौऱ्यात ते भारत आणि बागंलादेशसोबत भविष्यातील क्रिकेट दौऱ्याबद्दल चर्चा करणार आहेत. गांगुलीचा प्रस्ताव चांगला असल्याचे रॉबर्ट्स यांनी म्हटले असले तरी याबाबत कोणतेही ठोस आश्वासन त्यांनी दिलेले नाही. वाचा- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ यांना गांगुलीचा सुपर सीरिजचा प्रस्ताव फ्लॉप असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारची सीरिज खेळवली गेली तर ती यशस्वी होणार नाही. ही स्पर्धा म्हणजे मोठ्या देशांची मालिका ठरले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश अशा प्रकारची मालिका भरवून अन्य देशांना वेगळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लतीफने केला होता. पण आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने गांगुलीचा प्रस्ताव सकारात्मक घेतल्याने लतीफच्या टीकेला सडेतोड उत्तर मिळाल्याचे मानले जाते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PZaKA2
No comments:
Post a Comment