नवी दिल्ली: क्रिकेटसाठी २०१९ वर्ष अनेक अर्थाने विशेष ठरले. वनडेमध्ये नवा विश्वविजेता मिळाला. या वर्षात फलंदाजांसोबत गोलंदाजांनी ही दमदार कामगिरी केली. कसोटी असो की वनडे अथवा टी-२० जलद आणि फिरकीपटूंनी दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जाणून घेऊयात २०१९मधील तिन्ही प्रकारातील आघाडीचे गोलंदाज आणि त्यांची कामगिरी... ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा आणि जगातील क्रमांक एकचा गोलंदाज ()याने २०१९ वर्ष गाजवले. कमिन्सने कसोटीमध्ये सर्वाधिक ५९ विकेट घेतल्या. यंदाच्या वर्षी कसोटी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये तो अव्वल स्थानी आहे. त्याने १२ कसोटीतील २३ डावात २०.१३च्या सरासरीने ही कामगिरी केली. २३ धावा देत ६ विकेट ही त्याची एका डावातील तर ६२ धावा देत १० विकेट ही त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. कमिन्सने फक्त कसोटीत नव्हे तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने कसोटीत ५९, वनडेमध्ये ३१, तर टी-२० मध्ये ९ विकेट घेतल्या आहेत. एका वर्षात त्याने तिन्ही प्रकारात मिळून ९९ विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी अन्य कोणत्याच गोलंदाजाला करता आली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच २०१८मध्ये अशी कामगिरी भारताच्या जसप्रीत बुमराहने केली होती. त्याने एका वर्षात ७८ विकेट घेतल्या होत्या. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यादीत भारताचा ३३ विकेटसह सहाव्या स्थाावर आहे. क्रिकेटचा इतिहासावर नजर टाकल्यास श्रीलंकेच्य मुथय्या मुरलीधरन याने २००१मध्ये १३६ विकेट, तर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने १९९९मध्ये ११९ विकेट घेतल्या होत्या. वाचा- सर्वाधिक विकेट घेणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावरील गोलंदाज आहे ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क. त्याने १९.४५च्या सरासरीने ७७ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर मोहम्मद शमीचा क्रमांक लागतो. शमीने देखील ७७ विकेट घेतल्या आहेत. पण त्याची सरासरी १९.८१ इतकी आहे. तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शमी तिसऱ्या क्रमांकावर असला तरी वनडे क्रिकेटमध्ये या वर्षी सर्वाधिक विकेट त्यानेच घेतल्या आहेत. शमीने २१ सामन्यात ४२ विकेट घेतल्या आहेत. ६९ धावा देत ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज १) पॅट कमिन्स- ५९ विकेट २) नेथन लायन- ४५ विकेट ३) नील वॅग्नर- ४३ विकेट ४) स्टुअर्ट ब्रॉड- ४३ विकेट ५) मिचेल स्टार्क- ४२ विकेट वनडेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज १) मोहम्मद शमी- ४२ विकेट २) ट्रेंट बोल्ट- ३८ विकेट ३) लॉकी फर्ग्युसन- ३५ विकेट ४) मुझफ्फर रेहमान- ३४ विकेट ५) भुवनेश्वर कुमार- ३३ विकेट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Q9JuPe
No comments:
Post a Comment