![](https://maharashtratimes.indiatimes.com/photo/73017446/photo-73017446.jpg)
मुंबई: भारतीय संघाच्या दमदार कामगिरीचे सर्वात महत्त्वाचे कारण असेल तर ते फिटनेस होय. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघातील प्रत्येक खेळाडू जिममध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मेहनत घेत असतो. पुढील वर्षी भारतीय संघाचा कार्यक्रम व्यस्त असणार आहे. पाच जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामना, १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामना आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ जातोय. अशा लागोपाठ सामन्यांसाठी स्वत:ला फिट ठेवणे गरजेचे असते. टीम इंडियातील एका खेळाडूचा जिममधील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार सध्या रणजी स्पर्धेत खेळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रहाणे लवकर कोणताही सामना खेळणार नाही. असे असले तरी अजिंक्य घरी आराम न करता जिममध्ये मेहनत घेत आहे. जिममधील सरावाचा व्हिडिओ त्याने ट्विटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने हॅशटॅग #NoOffDays वापरला आहे. सर्वसाधारण हा हॅशटॅग विराट कोहली वापरतो. वाचा- 'जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्वत:ला झोकून दिले तर शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवश फक्त कॅलेंडरवर असतात', असे राहणे याने व्हिडिओ शेअर म्हटले आहे. राहणे सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि आंतरराष्ट्रीय कसोटीसह प्रथम श्रेणीच्या सामन्यात देखील तो चांगल्या धावा करत आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39p1KeX
No comments:
Post a Comment