![](https://maharashtratimes.indiatimes.com/photo/72990020/photo-72990020.jpg)
सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड ( ) यांच्यात बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला () काल सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये पाऊस किंवा खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण एखाद्या फोटोग्राफरमुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याची घटना नक्कीच तुमच्या वाचनात आली नसले. आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात फोटोग्राफर ख्रिस्टियन कोटे्ज (Christiaan Kotze) बातमीचा विषय ठरले. गुरुवारी कसोटी सामना सुरु होण्याआधी कोट्जे यांनी काही फोटो काढले आणि साइडस्क्रीनसमोरून चालत जात होते. तेव्हा अचानक सीमा रेषेवर असलेल्या दोरीवर पडले. घसरणाऱ्या पिच कव्हरवर त्यांचा पाय पडला होता. वाचा- अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. तातडीने वैद्यकीय पथक आले आणि त्यांना स्ट्रेचरवरून घेऊन गेले. कोटे्ज यांच्यावर उपचार करण्यात आले. पण या सर्व घटनेमुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. या घटनेमुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याबद्दल कोटे्ज यांनी दक्षिण आफ्रिकेचा ओपनर डीन एल्गर (Deal Alger) यांना त्रास झाला असेल अशी आशा व्यक्त केली. एल्गर पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने कोटे्ज यांनी हे वक्तव्य केले. वाचा- आफ्रिकी खराब सुरुवात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अॅडरसन (James Anderson) याने पहिल्याच चेंडूवर एल्गर याला बाद करत आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर ९७ धावात ४ तर ११५ धावांवर पाच गडी गमावले. पम त्यानंतर विकेटकिपर डी कॉकने केलेल्या ९५ धावांच्या जोरावर आफ्रिकेला दिवसा अखेर २७७ धावांपर्यंत मजल मारता आली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2rA5468
No comments:
Post a Comment