मुंबईः हवाई फटके मारणे म्हणजे गुन्हा नाही. हवेत फटकेबाजी केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होणार असेल, तर त्यात गैर काहीच नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. मुंबईतील त्याच्या क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षणार्थी मुलांशी संवाद साधताना त्याने हे मत व्यक्त केले. फलंदाजी करताना मोठी फटकेबाजी करण्यात कोणतेही नुकसान नाही. देखणे कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न करा. प्रशिक्षण काळात नेटमध्ये सराव करत असताना हवेत फटकेबाजी केल्यास आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आपल्याला चांगले परिणाम मिळत असतील, तर असे करणे चुकीचे आहे, असे रोहित म्हणाला. एखादा फलंदाज मोठे फटके मारून चांगली कामगिरी करत असेल, तर त्यात चुकीचे असे काहीच नाही. या पिढीतील फलंदाजांनी मोठे फटके मारले पाहिजेत. आक्रमक व फटकेबाजी करताना खेळाबद्दल त्यांना काय वाटते आणि खेळातील त्यांची समज काय आहे, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे, असेही रोहित याने सांगितले. फलंदाजी करताना आपणाकडून अनेक चुका होतात. मात्र, पुढीलवेळी फलंदाजी करताना आपल्याला त्या टाळता आल्या पाहिजेत, असे त्याने नमूद केले. एखाद्या फलंदाजात मोठे फटके मारण्याचे कसब असेल, तर त्याला रोखता कामा नये. त्यांना मोकळेपणाने खेळण्याची मुभा दिली पाहिजे, असेही रोहितने सांगितले. १९ वर्षाखालील भारतीय संघाबद्दल बोलताना सलामीवीर रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय क्रिकेटचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ उत्तम आहे. मागील आपण जिंकला होता. खूप मेहनत त्यांनी घेतली होती. त्यांना चांगले प्रशिक्षकही लाभले. यावेळेचा संघही दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल आणि पुन्हा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माने २०१९ हे वर्ष चांगलेच गाजवले. सरत्या वर्षांत रोहितने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून १० शतके झळकावली. त्यातील पाच शतके विश्वचषक स्पर्धेतील आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2EUPgOm
No comments:
Post a Comment