
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाता वनडेचा उपकर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली असून तो आयपीएलमधील गेली दोन सामने खेळू शकला नाही. इतक नव्हे तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील () चा विचार केला गेला नाही. रोहितला कसोटी, वनडे आणि टी-२० या तिनही संघातून दुखापतीमुळे वगळण्यात आले. भारतीय क्रिकेटसाठी आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स () तसेच रोहितच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. भारतीय संघात निवड न झाल्याबरोबर तो यापुढे आयपीएलला मुकणार अशी बातमी आली होती. पण आता रोहित शर्माच्या दुखापती संदर्भात एक अपडेट आली आहे. तो आठवड्याभरात पुन्हा एकादा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतो. फिटनेस सिद्ध केल्यास रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड होऊ शकते. वाचा- हिटमॅन रोहित शर्माच्या गैरहजेरीत केएल राहुल टी-२० आणि वनडे संघाचा उपकर्णधार असेल. त्याच बरोबर त्याला कसोटी संघात देखील स्थान देण्यात आले आहे. विकेटकिपर ऋषभ पंत देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने राहुलला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. रोहितला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित दोन सामने खेळू शकेलला नाही. रोहितसह इशांत शर्मा यांच्या दुखापतीवर बीसीसीआयच्या टीमचे लक्ष आहे. वाचा- बीसीसीआयच्या मते भलेही रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नसला तरी त्याच्या फिटनेसवर काम सुरू आहे. रोहित ३ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना खेळू शकतो. ही लढत प्ले ऑफच्या आधीची अखेरची साखळी फेरीतील लढत असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आयपीएलच्या अखेरच्या आठवड्यात खेळू शकतो. त्याच फिटनेस टेस्ट होईल त्यानंतर निवड समिती त्याचा संघात विचार करू शकेल. मुंबई इंडियन्सने दिलेल्या वृत्तानुसार रोहितची दुखापत बरी होत आहे. वाचा- मुंबई इंडियन्सला प्ले ऑफच्या आधी तीन सामने खेळायचे आहेत. त्यातील पहिली लढत २८ ऑक्टोबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध, ३१ ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तर ३ नोव्हेंबरल रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वनडे आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हा दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Htwnah
No comments:
Post a Comment