आबुधाबी: मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीवर दमदार विजय मिळवला. पण या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. या सामन्यात बाद झाल्यावर हार्दिक आणि ख्रिस मॉरिस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. पंड्या यावेळी मॉरिसला भर मैदानात भिडला होता. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक आणि मॉरिस यांच्यामध्ये नेमकं झालं तरी काय, पाहा...हार्दिक आणि मॉरिस यांच्यामध्ये या सामन्यात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली होती. या सामन्याच्या १५ व्या षटकात मॉरिसने हार्दिकला यॉर्कर आणि संथगतीने चेंडू टाकत चांगलेच हैराण केले होते. पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिकने षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या दोघांमध्ये तेव्हापासूनच शाब्दिक युद्ध रंगायला सुरुवात झाली होती. मॉरिस त्यानंतर १७व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात पुन्हा मॉरिस आणि पंड्या आमने-सामने आले होते. या षटकात मॉरिसने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. कारण या षटकात पंड्याला मोठे फटकेबाजी करता आली नाही. पण त्यानंतर १९व्या षटकात हे दोघे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर पंड्याने मॉरिसच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला. पण यानंतरच्या चेंडूवर मॉरिसने मोहम्मद सिराजकरवी पंड्याला झेलबाद केले. बाद झाल्यानंतर पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. बाद झाल्यावर तो मॉरिसच्या जवळ गेला आणि तो काही तरी पुटपुटला. त्यानंत मॉरिसनेही त्याला उत्तर दिले. त्यानंतर मैदान सोडताना पंड्या मॉरिसला हाताना इशारा करत असल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीनंतर सामनाधिकारी पंड्या आणि मॉरिस यांच्या वागण्यावर नाराज झाले होते. यावेळी सामनाधिकाऱ्यांनी या दोघांनाही ताकिद दिल्याचे समजते आहे. पंड्या आणि मॉरिस हे दोघेही क्रिकेटचे नियम न पाळल्यामुळे दोषी आढळले आहेत. या दोघांकडून पहिल्यांदाच ही चूक झाली, त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. यापुढे जर या दोघांकडून जर कोणतीही चूक घडली तर त्यांच्यावर आयपीएलच्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mygVIJ
No comments:
Post a Comment