अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या () ने धडाकेबाज खेळी केली. पण त्याचे शतक एका धावाने हुकले. गेल ९९ धावांवर बाद झाला. या सामन्यात गेलने ८ षटकार मारले आणि टी-२० प्रकारात १ हजार षटकारांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. पण धमाकेदार खेळी केल्यानंतर देखील त्याला दंड करण्यात आलाय. वाचा- राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हनची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये मनदीप सिंग बाद झाला. त्यानंतर गेल आणि कर्णधार केएल राहुलने शतकी भागिदारी केली. गेलने पहिल्या चेंडूपासून राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १९व्या षटकात जोफ्रा आर्चरने गेलची विकेट घेतली. तो ९९ धावांवर असताना बोल्ड झाला. विकेट गेल्यानंतर गेलने रागात बॅट जोरात फेकून दिली. यासाठी त्याला दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गेलला मॅच फीच्या १० टक्के दंड करण्यात आला आहे. गेलने आयपीएलच्या आचार संहिता कलम १ चे उल्लंघन केल्याने हा दंड करण्यात आला. वाचा- शुक्रवारी गेलेला आयपीएलमधील सातवे शतक करता आले नाही. ९९ धावांवर बाद झाल्याने त्याला राग अनावर झाला. ४१ वर्षीय गेल आज देखील मोठ्या आणि स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. गेलच्या या खेळीमुळे पंजाबला १८५ पर्यंत मजल मारता आली. पण पंजाबला त्याचा फायदा झाला नाही. राजस्थानने या सामन्यात १५ चेंडू राखून विजय मिळवला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने २४ चेंडूत ५० धावा करत धडाकेबाज सुरूवात करून दिली. यामुळे पंजाबला विजयाचा षटकार पूर्ण करता आला नाही. वाचा- ... राजस्थान रॉयल्स गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर पंजाब चौथ्या स्थानावर आहे. राजस्थानची अखेरची लढत कोलकाताविरुद्ध रविवारी होणार असून दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. तर पंजाबची अखेरची लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. वाचा- नाही
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kKaFwN
No comments:
Post a Comment